नरखेड – अतुल दंढारे
महाराष्ट्र राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटना यांनी २००५ नंतर शासकीय सेवेत लागलेल्या शिक्षक व कर्मचाऱ्यांना ‘जुनी पेंशन’ लागू व्हावी या मुद्द्यासाठी पुकारलेल्या बेमुदत संपाला सलग चौथ्या दिवशी तालुक्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला.
तहसील कार्यालय समोर हजारोंच्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.एकच मिशन. जुनी पेंशन, पेंशन आमच्या हक्काची,नाही कुणाच्या बापाची. या घोषणेने परिसर दणाणला.
या संपाला सभापती संजय डांगोरे, जि.प.सदस्य समीर उमप, माजी नगराध्यक्ष राहुल देशमुख यांनी भेट देऊन जाहीर पाठींबा दिला.
यावेळी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन संघटनेचे संयोजक राजेंद्र टेकाडे,निलेश पोपटकर,सिद्धार्थ लांडगे, लोकपाल टूले, प्रा.विशाल टेंभे,सरिता मडके,वैशाली बोरकर,रेखा मोहोड,मनोहर पठाडे, शंकर शेंदरे,शेषराव टाकळखेडे,मोरेश्वर साबळे, प्रा.हेमंत घोरसे,सुषमा चौधरी, त्रिलोक बागडे,रितेश बन्सोड, देवेंद्र उमप,प्रा.विरेंद्र इंगळे, दिपक डंभाळे, गजेंद्र कोल्हे, रामभाऊ धर्मे आदी उपस्थित होते.