Wednesday, September 18, 2024
Homeराज्यलोकनेते स्व. दि. बा. पाटील स्मृती पित्यार्थ लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक...

लोकनेते स्व. दि. बा. पाटील स्मृती पित्यार्थ लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने मोफत आरोग्य शिबीर…

कोकण – किरण बाथम

लोकनेते स्वर्गीय दि. बा पाटील स्मृती प्रीत्यर्थ लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थे च्या वतीने पनवेल आगरी समाज हॉल, लाईन माळी येथे मोफत चष्मे व श्रवणयंत्र वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष श्री. बाळूशेठ फडके यांनी केले होते.

कार्यक्रमाचे संयोजक मुंबई कुर्ला येथील मनराज प्रतिष्ठाण मेडिकल कॅम्प हे होते. शिबिराचे उद्घाटन ACP अशोक राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. शेकडो नागरिकांनी याचा लाभ घेतला. संपूर्ण महाराष्ट्र भर सामाजिक काम करणार असल्याचे प्रतिपादन लायन ग्रुप महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष बाळूशेठ फडके यांनी या वेळी केले.

या शिबिराला लोकनेते दि बा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील , प्रमुख अतिथी अनिल गलगली, मनराज प्रतिष्ठानचे मनोज नाथानी , ACP अशोक राजपूत, पनवेल शहर वरिष्ठ पोलीस अधिकारी नितीन ठाकरे, माजी नगराध्यक्ष चारुशीला घरत, त्यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते लायन ग्रुप उपाध्यक्ष रविदादा शेळके,

जय माता दी बिल्डर्स रमेशशेठ चौधरी, S.A रियल टेक संदीप शेठ पाटील, कर्जत बहुजन युथ पँथर अध्यक्ष बॉबीशेठ वाघमारे, हायकोर्ट ॲड. मनोज गाढवे, वेनगाव उपसरपंच गणेश नाना पालकर, नगरसेविका निताताई माळी, लायन ग्रुप सचिव संदीप पाटील, आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: