नांदेड – महेंद्र गायकवाड
सध्या शेतीच्या पिक विमा बाबत योजनेच्या डॉक्युमेंट व्हेरीफिकेशन व योजनेच्या नावाखाली तुम्हाला एक कॉल येईल त्या कॉलच्या माध्यमातुन समोरचा व्यक्ती तुम्हाला (OTP) मागु शकतो. एखादी लिंक पाठवेल त्यावर लिंक करायला सांगेल किंवा एखादे एप्लीकेशन ओपन करायला सांगेल आणि जर तुम्ही सांगितलेल्या लिंक वर क्लिक केले किंवा (OTP) सांगीतला तर तुमचा फोन हॅक होऊ शकतो, ज्यामुळे तुमचे बैंक अकाउंट देखील रिकामे होऊ शकते.
म्हणुन जनतेने अशा फॉड कॉल पासून सावध राहावे व पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी जनतेला केले आहे.
सध्या फॉड कॉल व ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार मोठया प्रमाणात वाढले असून या संदर्भात जनतेत जागृती व्हावी या उद्देशाने पोलीस अधीक्षक कार्यलयाने एक प्रेस नोट काढून कांही सूचनाचे पालन करण्याचे आवाहन जनतेला केले आहे.
अनओळखी मोबाईल क्रमांकावरून शेती विमा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन च्या नावाखाली कॉल आला त्यावर विश्वास ठेवु नये व आपली माहीती सांगु नका.
शेती विमा संदर्भात तुमचा मोबाईल नंबर व्हेरिफाय करण्यासाठी ओटीपी पाठवल्यास ते शेअर करू नका.
शेतकरी बांधवानो या फसवणुकीबद्दल सावध व्हा, जेणेकरून त्यांना या प्रकारच्या फसवणुकीपासुन तुम्ही वाचाल.
अशाप्रकारे आपल्या मोबाईल मधील अॅक्सेसची अनावश्यक परवानगी मागणारे अॅप किंवा त्यांनी दिलेल्या लिंकवर क्लिक करू नका.अशा सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
जर तुमच्या सोबत अशा प्रकारची फसवणुक झाल्यास तात्काळ सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधा.
सायबर शाखा टोल फि नंबर 1930, असुन, राष्ट्रीय स्तरावरील संकेतस्थळ ( http://cybercrime.gov.in/ ).
सायबर पोलीस स्टेशन, नांदेड फोन क्रमांक 02462-24027, असा आहे. ईमेल-([email protected]) यावर संपर्क साधण्याचे आवाहन नांदेड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.