Sunday, November 24, 2024
Homeराज्यपवनी (एकसंघ नियंत्रण) पेंच बफर वनक्षेत्रातील नवयुवकांना जिल्हा खनिजकर्म प्रतिष्ठानच्या सहाय्याने कौशल्य...

पवनी (एकसंघ नियंत्रण) पेंच बफर वनक्षेत्रातील नवयुवकांना जिल्हा खनिजकर्म प्रतिष्ठानच्या सहाय्याने कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत ड्रायव्हिंग लायसंन्स वाटप व पेंच प्रतिष्ठाना अंतर्गत MSCIT उतीर्ण प्रमाणपत्राचे वाटप…

रामटेक – राजु कापसे

पेंच व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत असलेल्या बफर क्षेत्रातील नवयुवकांना जिल्हा खनीकर्म प्रतिष्ठान यांच्या अर्थ सहाय्याने कौशल्य विकास कार्यक्रम अंतर्गत पवनी (एकसंघ नियंत्रण) वनपरिक्षेत्रातील निरनिराळ्या गावातील नवयुवकांना ड्रायव्हिंग लायसंन्स वाटप व पेंच प्रतिष्ठान अंतर्गत MSCIT उतीर्ण प्रमाणपत्राचे वाटप दिनांक 11/07/2024 रोजी अमलतास पर्यटक संकुलन सिल्लारी येथे करण्यात आले.

सदर प्रशिक्षण कार्यक्रम जिल्हा खनिजकर्म प्रतिष्ठान व पेंच व्याघ्र प्रतिष्ठान अंतर्गत लाभार्थांना नि:शुल्क प्रशिक्षण आयोजीत करुन राबविण्यात आला. यावेळी बफर क्षेत्राचे गावातील PRT नवयुवकांपैकी यशस्वीरित्या ड्रायव्हिंग TR लायसंन्स प्रशिक्षण पुर्ण करण्याऱ्या 26 नवयुवकांना लायसंन्स चे वाटप करण्यात आले. तसेच बफर गावातील ज्या युवकांनी MSCIT संगणक परिक्षा उतीर्ण केली, त्या 23 युवकांना MSCIT उतीर्ण प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला श्रीमती शांताबाई कुभरे,जि.प.सदस्य, चंद्रकात कोडवते सभापती प.स.रामटेक,प्रविण उईके, सरपंच ग्रामपंचायत पिपरीया,संजय नेवारे, माजी प.सं.सभापती,विवेक राजुरकर, वनपरिक्षेत्र अधिकारी पुर्व पेंच हे प्रमुख्याने हजर होते. जयेश तायडे,वनपरिक्षेत्र अधिकारी पवनी (एकसंघ नियंत्रण) यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक करुन पेंच व्याघ्र प्रकल्प अंतर्गत सुरु असलेले निरनिराळे प्रकल्प,कंपोस्ट खत निर्मिती, कुकुट पालन,दुधाळ गाईचे वाटप, ड्रायव्हिंग लायसंन्स प्रशिक्षण, MSCIT प्रशिक्षण, मराठी – इंग्रजी टायपिंग प्रशिक्षण, पेंच गोमाय प्रकल्प, प्राईड ऑफ पेंच शिवन काम प्रकल्प, महिला बचत गटांना वाटप करण्यात आलेल्या पिठ गिरणी, मसाला मशीन या सर्व प्रकल्पांची माहिती उपस्थितांना दिली. बफर क्षेत्रातील लोंकाना उपजीवीकेसंदर्भात आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्प, नेहमी अग्रेसर राहील याबाबत, सर्वाना हमी दिली.

सदर कार्यक्रमाला पवनी बफर क्षेत्रातील 14 गावातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास समिती चे अध्यक्ष व सचिव विशेष करुन हजर होते. या शिवाय पवनी बफर क्षेत्रात कार्यरत प्राथमिक प्रतिसाद दलातील 85 सदस्य हजर होते. तसेच प्रज्ञा टाईपिंग ईंस्टीट्युड चे रुपेश सरोदे, सई ड्रायव्हिंग स्कुल चे कुभलकर हजर होते. शांताबाई कुभरे जि.प.सदस्य यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पागामार्फत सुरु असलेल्या कामाची प्रशंसा करुन याबाबत पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्री.प्रभुनाथ शुक्ल यांची प्रशंसा केली.

श्री. चंद्रकात कोडवते,प.स.सभापती यांनी सुध्दा पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक श्री.प्रभुनाथ शुक्ल यांची प्रशंसा करुन पेंच व्याघ्र प्रकल्पातील निरनिराळ्या विकास कामाकरीता पाठपुरावा करुन त्याकरीता विशेष कार्य करणारे या मतदार संघाचे आमदार श्री.ॲङ आशिषजी जयस्वाल यांच्या आभार व्यक्त केले. श्री.विवेक राजुरकर , वनपरिक्षेत्र पुर्व पेंच यांनी पेंच व्याघ्र प्रकल्पातंर्गत सुरु असलेल्या नवसंकल्पनाची माहिती देवुन उपस्थितांचे आभार व्यक्त केले. या वेळी पवनी (एकसंघ नियंत्रण) वनपरिक्षेत्रातील श्री. राजु उईके,क्षेत्रसहाय्यक पवनी, श्री.आय.आर.पठाण,क्षेत्रसहाय्यक चोरबाहुली व वनकर्मचारी हजर होते.

Raju Kapse
Raju Kapsehttp://mahavoicenews.com
मी, राजू कापसे रा, रामटेक जि, नागपूर येथील रहिवासी असून मी पत्रकारिता क्षेत्रात गेल्या 30 वर्षा पासून आहे. महाव्हाईस न्यूज च्या मुख्यकार्यकारणी व्यवस्थापन संघाचा सदस्य आहे, जेव्हापासून महाव्हाईस न्यूज ची सुरुवात झाली तेव्हापासून रामटेक तालुक्यातील काम सांभाळत आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: