Thursday, November 21, 2024
Homeव्यापारपेटीएमची सॅमसंग स्टोअर्ससह भागीदारी...

पेटीएमची सॅमसंग स्टोअर्ससह भागीदारी…

सॅमसंग स्टोअर्समध्ये स्मार्ट पीओएस उपकरणे आणि पोस्टपेड ऑफर उपलब्ध

देशातील डिजिटल पेमेंट्स आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आणि क्युआर  कोड व  मोबाइल पेमेंटची प्रणेती कंपनी पेटीएमने आपल्या ऑफलाइन पेमेंट वितरण सेवेचा विस्तार करण्यासाठी सॅमसंगशी भागीदारी केली आहे. या भागीदारीमुळे, पेटीएम ग्राहकांना देशभरात पसरलेल्या सॅमसंग अधिकृत स्टोअर्समध्ये स्मार्ट पीओएस उपकरणे आणि पोस्टपेड ऑफर उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे त्यांना डिजिटल पेमेंट अधिक सुलभ होईल.

आता, लॅपटॉप, स्मार्टफोनपासून टीव्ही, स्मार्ट घड्याळे, रेफ्रिजरेटर आदी सॅमसंग उपकरणे खरेदी करणारे ग्राहक देशातील कोणत्याही सॅमसंगच्या अधिकृत स्टोअर्समध्ये पेटीएम यूपीआय, पेटीएम  वॉलेट, पेटीएम पोस्टपेड आणि सर्व प्रमुख डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड आणि प्रीपेड कार्ड वापरून पेमेंट करू शकतील. तसेच पीओएस उपकरणांद्वारे पोस्टपेड ऑफरच्या मदतीने ‘आता खरेदी करा, नंतर पैसे द्या’या पर्यायाचाही लाभ घेऊ शकतात.

ज्यामुळे ग्राहकांना बजेटची चिंता न करता उत्पादने खरेदी करता येतील. पेटीएम पोस्टपेडसाठी काही वित्तीय संस्थांशी  भागीदारी करण्यात आली असून त्यामुळे ग्राहकांना ६० हजार रुपयांपर्यंतचे मासिक कर्ज मिळू शकते. ग्राहक अधिकृत स्टोअर्समध्ये उत्पादने खरेदी करण्यासाठी या   सुविधेचा वापर करू शकतात आणि कमी व्याजदरात सुलभ मासिक हप्त्यांद्वारे परतफेड करू शकतात.

पेटीएम पोस्टपेड व्यतिरिक्त, ग्राहक वस्तू खरेदी करण्यासाठी पेटीएमच्या वित्तीय संस्था भागीदारांद्वारे ऑफर केलेल्या – दोन लाख रुपयांपर्यंतच्या वैयक्तिक कर्ज सुविधेचाही लाभ घेऊ. पेटीएम पीओएस उपकरणांद्वारे केलेल्या पेमेंटसाठी आकर्षक ऑफर्ससह नो कॉस्ट ईएमआय पर्यायदेखील उपलब्ध आहे. पीओएस उपकरणांमुळे  व्यापार्‍यांना सुलभ बिलिंग, एकात्मिक पेमेंट्स, जाहिराती किंवा रीअल-टाइम इन्व्हेंटरी स्थिती यासह अनेक वैशिष्ट्यपूर्ण सुविधांचा लाभ मिळतो. पेटीएम पीओएस उपकरणांमुळे  व्‍यवहार पूर्ण झाल्याची सूचना आवाज, व्हिज्युअल आणि प्रिंट अशा तीनही प्रकारच्या पर्यायांद्वारे मिळते.

पेटीएमच्या कर्ज आणि पेमेंट्स विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भावेश गुप्ता म्हणाले, “आम्ही ऑफलाइन पेमेंट्स बाजारपेठेत नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत असून आमच्या पीओएस उपकरणांमुळे व्यापारी ग्राहकांचा विश्वासाला बळ मिळत आहे. सॅमसंग स्टोअर्स सोबतच्या भागीदारीमुळे आम्हाला स्मार्ट पेमेंट्सची सुविधा ग्राहकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचवता येईल.”

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: