Monday, December 23, 2024
Homeव्यापारपेटीएमने आभा हेल्थ लॉकर सुविधा लॉन्च केली...

पेटीएमने आभा हेल्थ लॉकर सुविधा लॉन्च केली…

आरोग्यविषयक सर्व कागदपत्रे एका ठिकाणी ठेवण्यासाठी तसेच वापरण्यासाठी उपयुक्त…

भारतातील आघाडीची डिजिटल पेमेंट्स व आर्थिक सेवा कंपनी, तसेच क्यूआर व मोबाइल पेमेंट्सची अग्रणी कंपनी ब्रॅण्ड पेटीएमची मालक असलेल्या वन९७ कम्युनिकेशन्स लिमिटेडने (ओसीएल) आज वापरकर्त्यांना त्यांची आरोग्यविषयक कागदपत्रे स्टोअर करून ठेवण्याची सुविधा देणाऱ्या पेटीएम आभा हेल्थ लॉकरची घोषणा केली. पेटीएम हेल्थ लॉकरच्या माध्यमातून वापरकर्ते त्यांची सर्व वैद्यकीय कागदपत्रे थेट आरोग्यसेवा आस्थापनांना पाठवू शकतात.

आयुष्मान भारत डिजिटल मिशनचा भाग असलेले पेटीएम हे एक प्रमाणित सार्वजनिक आरोग्य नोंदणी अॅप आहे. वापरकर्त्याने पेटीएम अॅपवर आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट (आभा) तयार केल्यानंतर पेटीएम आभा हेल्थ लॉकर उपलब्ध होऊ शकेल. आभा हा एक अनन्यसाधारण आरोग्य क्रमांक असून, आरोग्यसेवा आणि व्यक्तिगत वैद्यकीय नोंदी उपलब्ध करून घेण्यासाठी तो प्रत्येक नागरिकाला पुरवला जातो.

आभा क्रिएट केल्यानंतर एक क्यूआर कोड जनरेट होतो आणि हा क्यूआर कोड रुग्णालये व क्लिनिक्समध्ये स्कॅन करून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने वापरकर्त्याचा वैद्यकीय इतिहास बघितला जाऊ शकतो. याशिवाय, पेटीएम आभा हेल्थ लॉकर, वापरकर्त्यांना क्यूआर कोडचा वापर करून विशिष्ट रुग्णालयांमध्येअपॉइंटमेंट बुक करण्याची मुभा देते, त्यामुळे त्यांना दीर्घ रांगा टाळता येऊ शकतात.

आभा हेल्थ लॉकरच्या माध्यमातून वापरकर्ता आरोग्य विमा पॉलिसी, निदानाचे रिपोर्टस्, प्रिस्क्रिप्शन्स, वैद्यकीय बिले, कोविड लसीकरण प्रमाणपत्र पीएमजेएवाय कार्डस् यांसारखी अनेक कागदपत्रे अपलोड करून ठेवू शकतो/ते. पेटीएम हेल्थ लॉकरवरील डेटाला राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाची मान्यता असून, वापरकर्त्याच्या खासगीत्वाची खात्री करण्याच्या दृष्टीने हा लॉकर ठोस सुरक्षितता व एनक्रिप्शन यंत्रणेद्वारे घडवण्यात आला आहे.

 आभा हेल्थ लॉकर २ सोप्या पायऱ्यांमध्ये कसे तयार करायचे:

१. ‘आभा हेल्थ लॉकर’चा शोध घ्या किंवा पेटीएम हेल्थ विभागात ‘आभा हेल्थ लॉकर’ तुम्हाला दिसेल. तुमच्या मोबाइल क्रमांकाची पडताळणी करण्यासाठी ओटीपी एण्टर करा आणि तुमचे तपशील भरून प्रोफाइल तयार करा. तुम्हाला आभा अॅडरेस तयार करण्यास सांगितले जाईल. 

२. सर्व आवश्यक कागदपत्रे पेटीएम हेल्थ लॉकरमध्ये अपलोड करा, जेणेकरून भविष्यकाळात ती सोयीस्कररित्या प्राप्त करता येतील.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: