Paytm fined : पेटीएमच्या अडचणी थांबायचं नाव घेत नाही आहे. आता फायनान्शिअल इंटेलिजेंस युनिट ऑफ इंडिया (FIU-IND) ने मनी लाँड्रिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल पेटीएम पेमेंट बँकेला 5.49 कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे. फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट ऑफ इंडिया हे वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते. वित्त मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट- इंडियाने पीएमएलए कायदा 2022 अंतर्गत पेटीएमवर हा दंड ठोठावला आहे.
जुगार खेळत असल्याचे आढळून आले
फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट-इंडियाला तक्रार प्राप्त झाली होती, असे वित्त मंत्रालयाने एक निवेदन जारी केले. पेटीएम पेमेंट्स बँकेच्या काही युनिट्स आणि नेटवर्कवर ऑनलाइन जुगार खेळला जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पेटीएमने जुगाराचे पैसे बेकायदेशीरपणे पेटीएम पेमेंट्स बँकेत हस्तांतरित केल्याचे तपासात समोर आले आहे. ज्यांच्या खात्यावर PMLA कायदा 2022 च्या कलम 13(2)(d) अंतर्गत फायनान्शियल इंटेलिजेंस युनिट- इंडियाने हा दंड ठोठावला आहे.
RBI ने बंदी घातली होती
यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी विजय शेखर शर्मा यांनी पेटीएम पेमेंट बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. 31 जानेवारी 2024 रोजी आरबीआयने पेटीएम पेमेंट बँकेवर बंदी घालण्याचा आदेश जारी केला होता. सध्या या आदेशाला १५ मार्चपर्यंत अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. दरम्यान, पेटीएम यूपीआय व्यवहार सुरू ठेवण्यासाठी येस बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक आणि एसबीआय बँकेसह इतर बँकांशी बोलणी करत आहे.
पेटीएमचे प्रयत्न सुरूच आहेत
आज सकाळी पेटीएमने सांगितले होते की कंपनीने अवलंबित्व कमी करण्यासाठी पेटीएम पेमेंट बँकेसोबत आंतर-कंपनी करार संपवला आहे. यापूर्वी कंपनीने सांगितले होते की ते इतर बँकांशी नवीन करार करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरुन कुणालाही कोणतीही अडचण येऊ नये आणि ग्राहक आणि व्यापाऱ्यांना कोणत्याही व्यत्ययाशिवाय सेवा मिळत राहतील.
#Paytm Payments Bank fined ₹5.49 crore for money laundering, says Finance ministry: Reporthttps://t.co/rJ9ijAbinH pic.twitter.com/eL1BoK7Cc9
— Hindustan Times (@htTweets) March 1, 2024