Sunday, December 22, 2024
Homeराज्यअचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी...शरद दाहेदार

अचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी…शरद दाहेदार

अमरावती,१६ ऑक्टोबर २०२२

वीज बिलातून होणारी वसूली हे एकमेव महावितरणच्या उत्पन्नाचे साधन असल्याने ,नियमित आणि वेळेत वसूली महावितरणसाठी किती महत्वाची आहे याबाबत ग्राहकांना पटवून द्यावे. तसेच ग्राहकांना अचूक वीजबिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे.त्यामुळे अचूक वीज बिलासाठी लेखा विभागाने प्रयत्न करण्याचे निर्देश महाव्यवस्थापक (वित्त व लेखा) शरद दाहेदार ,नागपुर प्रादेशिक कार्यालय यांनी दिले.

अचलपूर विभागात झालेल्या आढावा बैठकित ते बोलत होते.यावेळी त्यांनी अचूक मीटर वाचन, वसुली, वीजबिल थकबाकी,कोटेशनवर देण्यात येत असलेली कामे, सुरू असलेले काम , ईआरपी,कंत्राटदारांचे थकित बिल इत्यादी विषयांचा सविस्तर आढावा घेतला. वीज ही अत्यावशक सेवा असल्याने ग्राहकाभिमूक सेवा देण्यावर सर्वांचा जोर असावा.तसेच वीजबिलाची वसुली हा महावितरणचा कणा असल्याने ती मागे पडू नये यासाठी प्रयत्न करण्याचे यावेळी त्यांनी निर्देश दिलेत.

या बैठकीला कार्यकारी अभियंता संजय श्रृंगारे,वरीष्ठ व्यवस्थापक (विवले) सचिन जीवने, व्यवस्थापक (विवले)यज्ञेश क्षीरसागर,
उपव्यवस्थापक राजेश तीवारी यांच्यासह तांत्रिक,वित्त व लेखा आणि मानव संसाधन विभागाचे अधिकारी कर्मचारी  या बैठकिला उपस्थित होते.

*प्रमोद बडोदेच्या अपघाती निधनाचा महावितरणलाही धक्का !*

अचलपुर विभागाचे उपव्यवस्थापक (लेखा) प्रमोद बडोदे (४५ वर्ष) यांचा कार्यालयातून घरी जात असतांना मोटार सायकल घसरून अपघात झाला. या अपघातात त्यांच्या मेंदुला मार लागल्याने उपचारादरम्यान त्यांचा दिनांक ११ ऑक्टोबर रोजी मृत्यु झाल्याने याचा बडोदे कुटूंबियासोबत महावितरणला मोठा धक्का असल्याचे उदगार श्री शरद दाहेदार महाव्यवस्थापक नागपुर प्रोदेशिक कार्यालय यांनी  बडोदे कुटूंबियांची सांत्वना करतांना काढले.

श्री शरद दाहेदार यांनी बडोदे कुटूंबिय व प्रमोद बडोदे यांची पत्नी व त्यांच्या मुलांशी प्रत्यक्ष अचलपुर येथे जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रादेशिक संचालक श्री सुहास रंगारी यांनी दिलेले सांत्वना संदेश बडोदे  कुटूंबियाना देत महावितरणकडून सर्व सहकार्य करण्यात येयील याबाबत बडोदे कुटूंबियांना आश्वस्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: