मिलिंद इंगळे, मुर्तिजापूर
मुर्तिजापूर तालुक्यामध्ये भीषण पाणीटंचाई अजून जाणवते, उन्हाळ्या लागला की पावसाळा लागेपर्यंत पाण्यासाठी ग्रामीण मध्ये पायपीट करावी लागते, तर शहरांमध्ये टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागते. त्यामध्ये ही टॅंकरवाले तारखा वर तारखा देतात त्यांच्या तारखेनुसार पाणी भरून घ्यावे लागते व दाम पण आवाक्याबाहेर वसूल करून घेतात.
मुर्तिजापूर मध्ये पंधरा वर्षांपासून एकाच पक्षाची सत्ता असल्यावर ही पाण्याच्या प्रश्न निकाली लागलेला नाही. ही मुर्तिजापूरसाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. पाणीच नसल्याने मुर्तिजापूरवाशीयांना उष्णतेचे प्रमाण आरोग्यावर दिसून येत आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे उष्माघाताचे प्रमाण सर्वाधिक मुर्तिजापूर मध्ये आढळून येते.घरात थांबावे तर उष्णता, बाहेर पडावे तर उष्माघाताचा फटका,अशा पेचमध्ये येथील नागरीक त्रस्त व हवालदिल झाले आहेत.नागरिकांचे म्हणणे आहे की प्यायालाच पाणी उपलब्ध नाही तर कुलर मध्ये कुठून पाणी आणणार अशी समस्या मुर्तिजापूर येथे आढळून येत आहे.
अकोला जिल्ह्यातील एकमेव विकसित तालुका मुर्तिजापूर मानले जाते.पण पाणीच नसल्याने कोठे विकास आहे, कोठे उन्नती आहे, अशी तक्रार आढळून येत आहे, जुन्या काळात हरेक समाजाचे लोकं जिथे विहीर, जिथे नदी, जिथे पाणी आहे, अशा ठिकाणी संबंध करून मुली देत.पण पाण्यामुळे हाच परिणाम आता येथिल मुलांवर, घरांवर दिसून येत आहे.
बोअर हा पाण्यासाठी शेवटचा पर्याय असतो. पण मुर्तिजापूर मध्ये सहाशे फुटावर ही पाणी लागत नाही,एवढी बिकट परिस्थिती नगर वासियांवर दिसून येत आहे. पाण्याचा प्रश्न कोण मिटवणार अशी अपेक्षा नागरिकांची नेत्यांवर लागलेली आहे. याचा परिणाम पुढिल विधानसभा निवडणुकीत नक्कीच आढळून येईल असे दिसून येत आहे.