डॉ.होमी भाभा गणित, विज्ञान परीक्षेचा निकाल जाहीर…
पातूर – निशांत गवई
डॉ. होमी भाभा राष्ट्रीय गणित, विज्ञान परीक्षेचा निकाल नुकताच घोषित झाला. यामध्ये पातूर येथील किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ची विद्यार्थिनी विधी प्रशांत बंड हिने विदर्भातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
डॉ. होमी भाभा फाउंडेशन मुंबईच्या वतीने संपूर्ण देशात राष्ट्रीय गणित, विज्ञान क्षमता चाचणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत देशातील बारा राज्यातून जवळपास 12 लाखाचे वर विद्यार्थी बसले होते. तर महाराष्ट्रातून एकूण 1 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
यामधून बत्तीस हजारचे वर विद्यार्थी दुसऱ्या पातळीसाठी पात्र ठरले होते. यामधून किड्स पॅराडाईज पब्लिक स्कूल ची इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु विधी प्रशांत बंड हिने विदर्भातून प्रथम क्रमांक मिळवला आहे. यांनतर तिसऱ्या टप्प्यात होणाऱ्या शिष्यवृत्ती साठी होणाऱ्या ऑनलाईन मुलाखतीसाठी ती विदर्भातून निवड झालेली एकमेव विद्यार्थिनी ठरली आहे.
नुकतेच एका सोहळ्यात तिला डॉ. होमी भाभा फाउंडेशन मुंबई चे विदर्भ मुख्य कार्यपालन अधिकारी जी. पी. तिवारी, अकोला जिल्हा मुख्य कार्यपालन अधिकारी मंदार पाठक, किड्स पॅराडाईजचे संस्थापक अध्यक्ष गोपाल गाडगे, कार्यकारी संचालिका सौ. ज्योत्स्ना गाडगे यांच्या हस्ते सन्मानीत करण्यात आले. यावेळी विज्ञान शिक्षक हरिष सौंदळे, नरेंद्र बोरकर प्रामुख्याने उपस्थित होते. संचालन श्रावणी गिऱ्हे, अमृता शेंडे यांनी केले.
कार्यक्रमाला मुख्याध्यापक चंद्रमणी धाडसे, नितु ढोणे, निकिता भालतिलक, प्रीती धोत्रे, लक्ष्मी निमकाळे, नयना हाडके, शीतल कवडकर, तृप्ती पाचपोर, रविकिरण अवचार, योगिता देवकर, शानू धाडसे, प्रियंका चव्हाण, अश्विनी आवटे, बजरंग भुजबटराव, अविनाश पाटील, रुपाली पोहरे, शुभम पोहरे, आदींनी परिश्रम घेतले.