Monday, December 23, 2024
Homeगुन्हेगारीपातूर | कुजलेल्या अवस्थेत आढळले अनोळखी प्रेत...

पातूर | कुजलेल्या अवस्थेत आढळले अनोळखी प्रेत…

पातूर : तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन हद्दीतील वाडेगाव नजीक असलेल्या चिंचोली गणू शेत शिवारातील धाडी बल्लाळी येथील जंगलात एक कुजलेल्या अवस्थेतील प्रेत वाढल्याची घटना उघडकीस आली आहे.

पातूर तालुक्यातील चान्नी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या वाडेगाव नजीक चिंचोली गणू शेतशिवारातील धाडी बल्लाळी येथे एक पुरुष जातीचे अनोळखी प्रेत अंत्यत कुजलेल्या अवस्थेत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले असता परिसरात एकच खळबळ माजली होती.सदर घटनेची माहिती काही सुज्ञ नागरिकांनी चान्नी पोलिसांना दिली असता चान्नी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पाहणी केली असता सदर ठिकाणी एक पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले.

त्याबाबत पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता मृतकाची ओळख निष्पन्न झाली नाही. दरम्यान चान्नी पोलिस दलाचे ठाणेदार योगेश वाघमारे, उपनिरीक्षक गणेश महाजन, पो.हवालदार शिंदे यांनी घटनास्थळी जाऊन प्राथमिक चौकशी व पंचनामा करून सदर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविला असून अधिक तपास चान्नी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: