Sunday, December 22, 2024
Homeगुन्हेगारीपातुर | शिर्ला फाट्यावर दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक...दुचाकीस्वार जागीच ठार

पातुर | शिर्ला फाट्यावर दुचाकीस अज्ञात वाहनाची धडक…दुचाकीस्वार जागीच ठार

पातूर : पातूरनजीक असलेल्या शिर्ला फाट्यावर एका दुचाकीस्वारास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. अकोल्याकडून पातूरकडे येत असताना पातूरपासून 5 किमी अंतरावर असलेल्या शिर्ला फाट्यावर एका अज्ञात वाहनाने दुचाकी क्र.MH 30 BQ 1242 ला जबर धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला.ही धडक एवढी जबर होती की दुचाकीस्वाराचा अक्षरशः मेंदु बाहेर पडला होता.

सदर मृतक दुचाकीस्वार हा प्रदीप फुलसिंग राठोड (वय अंदाजे 26) रा.वरखेड वाघजाळी असे असून हा युवक वाघजाळी येथील आपल्या गावावरून सासुरवाडी असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील पारखेड येथे दिवाळीला गेलेल्या पत्नीला आणण्यासाठी जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला आहे.मृतक युवक हा एकुलता एक असून केवळ सहा महिन्यांपूर्वी त्याचे लग्न झाले असल्याने वाघजाळी गावात हळहळ व्यक्त होत आहे.

शिर्ला फाट्यावर अपघाताचे सत्र थांबता थांबेना,सदर ठिकाणी या अगोदर देखील दोन जबर अपघात झालेले असतांना आज तिसऱ्या अपघातात युवकास आपले प्राण गमवावे लागले.महामार्गाचे काम सुरू असून दिशा फलक नसल्याने येथे नेहमीच अपघात होतात अशी चर्चा यावेळी ग्रामस्थांकडून ऐकावयास मिळाली.

यावेळी पातूर पोलीस स्टेशनचे रामानंद भवाने,अभिजित आसोलकर,सचिन दळवी यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा करून मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालय अकोला येथे पाठविले असून पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: