Monday, December 23, 2024
Homeराज्यभारतीय बौद्ध महासभेची पातूर तालुका कार्यकारणी...

भारतीय बौद्ध महासभेची पातूर तालुका कार्यकारणी…

पातुर – निशांत गवई

पातुर तालुक्यातील सात जानेवारी रोजी भारतीय बौद्ध महासभेची बैठक संपन्न झाली. यामध्ये नुकतीच कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे यावेळी या बैठकीमध्ये सर्वप्रथम सामुहिक त्रिशरण पंचशिल घेण्यात आले. त्यानंतर बौद्धांची स्वतंत्र व्यवस्था आणी डॉ. बी. आर. आंबेडकर बुद्धीष्ट बँक निर्माण करण्याबाबत जिल्हा पदाधिकार्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

शेवटी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष डॉ. अरुण चक्रनारायण यांनी पातूर तालुका कार्यकारणी मध्ये त्यामध्ये पातूर तालुका अध्यक्षपदी संतोष मधुकर इंगळे यांची निवड करण्यात आली तर उपाध्यक्ष धनजंय मोहन उपर्वट देवूळगांव, उपाध्यक्ष विनय दाभाडे तुलंगा खूर्द, सचिव सुशिल गवई आसोला, संघटक राहुल सुरवाडे भंडारज बु , आणी प्रसिद्धी प्रमुख पदी प्रसेनजीत रोकडे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचीत कार्यकारणीचे सर्वानी स्वागत केले. बैठकीला बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: