Sunday, September 8, 2024
spot_img
Homeगुन्हेगारीपातूर |....म्हणून त्याने मित्राच्या मदतीने केले पत्नीचे असले व्हिडिओ व्हायरल...पतीसह मित्राविरुद्ध चान्नी...

पातूर |….म्हणून त्याने मित्राच्या मदतीने केले पत्नीचे असले व्हिडिओ व्हायरल…पतीसह मित्राविरुद्ध चान्नी पोलिसात गुन्हा दाखल…

निशांत गवई,प्रतिनिधी । पातूर
पातूर : स्वत:च्या पत्नीला मित्राद्वारे ब्लॅकमेल करायला लावणारा पती व त्याच्या मित्राविरुद्ध चान्नी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पत्नीला सोडचिठ्ठी देता येईल व प्रेयसी सोबत संबंध ठेवण्याच्या इराद्याने पतीने असे कृत्य केल्याचा आरोप पत्नीने केला आहे.
पातूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावातील महिलेने पोलिसांत तक्रार केली, की तिच्या पतीने व पतीचा मित्र शेख मुस्तकीन शेख यासिन शेख याने तिचे अश्लील व्हिडीओ व्हायरल करुन बदनामी केली आहे.

पीडित महिलेच्या पतीचे गावातीलच एका महिलेशी संबंध आहेत. त्या महिले सोबत संबंध कायम ठेवण्यासाठी पीडितेच्या पतीने मित्राला हाताशी धरले. पतीने त्याच्या मित्राला पत्नीसारखीच दिसणाऱ्या एका महिलेचे अश्लील व्हिडीओ पाठवले. त्यानंतर मित्राने तिला फोन करुन तिचे अश्लील व्हिडिओ त्याच्याकडे असल्याचे सांगून संबंध प्रस्तापित करण्यासाठी ब्लॅकमेल करण्याचा अनेकदा प्रयत्न केला. त्यानंतरही तो फोन करुन सदर व्हिडीओ तिच्या पतीला दाखवतो असे म्हणून ब्लॅकमेल करायचा. तसेच तिच्या पतीनेच त्याला तिचे अश्लिल व्हिडिओ पाठवल्याचे त्याने सांगितले.

जानेवारी महिन्यात महिलेने हा प्रकार तिच्या पतीला सांगितला तर पतीनेच हे घडवून आणल्याचे तिला कळले व तिच्या पायाखालची वाळूच सरकली. पती व त्याच्या मित्राने तिचे व्हिडिओ व्हायरल करुन नातेवाईकांमध्ये बदनामी केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून चान्नी पोलिसांनी पीडित महिलेचा पती व त्याचा मित्र शेख मुस्तकीन शेख यासिन शेख याच्याविरुद्ध भादंविचे कलम ३५४ क, ड, ३२३,५०१,५०६, आरडब्लू ६७ अ माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: