पातूर : स्थानिक बागायत महसुली भागातील शेत सर्वे नंबर 239 मधील सचिन समाधान ढोणे यांच्या शेतातील पांढऱ्या चंदनाचे झाड चोरी करून नेण्याच्या उद्देशाने कापलेले झाड शेताच्या बांधावर कापून पडलेले असल्याचे संबंधित शेतकऱ्याच्या लक्षात आले . झाडाचा गाभा परिपक्व झाला नसल्यामुळे चोरट्यांनी तोडलेले झाड तिथेच टाकून तिथून निघून गेले त्यावरून शेतकऱ्याने वन विभागाला तक्रार करण्याचा प्रयत्न केला असता विभागाने तक्रार पातुर पोलीस स्टेशनला द्या म्हणून सांगितले तर पातुर पोलीस स्टेशनला तक्रार करण्यासाठी फिर्यादी गेला असता पोलीस स्टेशन ने तक्रार तर घेतली परंतु अदाखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.
या सदर प्रकरणात शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले त्याला न्याय कोण देणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे आधीच अस्मानी आणि सुलतानी संकटात शेतकरी होरपळून निघालेला आहे आपली आर्थिक बाजू बळकट करण्याच्या दृष्टीने धडपड करून वेगवेगळे प्रयोग शेतात करीत असतो काही शेतकरी आपल्या शेताच्या बांधावर चंदनासारखे मौल्यवान झाडे लावून त्याचे संगोपन व संवर्धन करतो परंतु अश्या चोरींच्या घटनांमुळे सामान्य नागरिकासह शेतकरी सुद्धा वैतागला आहे अशी परिस्थिती पातुर तालुक्यात अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे याला पायबंद घालण्यासाठी कठोर कायदा करण्याची गरज असल्याचे जनसामान्य नागरिकात बोलल्या जात आहे शेतकऱ्याच्या सदर झालेल्या नुकसानीला जबाबदार कोण ? असा प्रश्नही यानिमित्त उपस्थित होत आहे.