Thursday, September 19, 2024
HomeBreaking Newsपातूर पाेलिसांनी जप्त केले तांदुळाचे ६० कट्टे...तपासणीसाठी प्रयाेग शाळेत पाठवणार

पातूर पाेलिसांनी जप्त केले तांदुळाचे ६० कट्टे…तपासणीसाठी प्रयाेग शाळेत पाठवणार

तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे कि नाही, हे हाेणार स्पष्ट

निशांत गवई |पातूर
पाेलिसांनी ६० कट्टे तांदूळ जप्त केले आहेत. तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे, हे स्पष्ट करता येणार नाही, असा अहवाल पातूरच्या पुरवठा विभागाने दिला आहे. त्यामुळे आता पाेलिस हा तांदुळ प्रयाेग तपासणी साठी प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार आहे. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच त्यानुसार पुढील कार्यवाही हाेणार आहे.

आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे वितरण करण्यात येते. विविध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार लाभार्थ्यांना धान्य उपलब्ध करुन देण्यात येते. यात गहू, तांदूळ, मका, साखरेचाही समावेश असताे. मात्र या धान्याची विक्री काळ्यात बाजरारात हाेत असल्याची बाब अनेकदा उजेडात येते. दरम्यान गुरुवारी वाडेगाव येथून माझोड मार्गे बार्शीटाकळीकडे एक पिकअप गाडी रेशनचा तांदूळ घेऊन जात असल्याची माहिती पातूर पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर पोलिसांनी एमएच-३७-जे-२७८६ हे मालवाहू वाहन थांबवले. वाहनामध्ये ६० कट्टे तांदूळ होते. पाेलिसांनी पंचनामा करून सदर वाहन ठाण्यात आणले. याबाबत पाेलिसांनी तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाला पत्र दिले. पाहणी करून अहवाल देण्यात यावा, असेही त्यात नमदू केले.

अहवालानंतर हाेणार कारवाई
पातूर तहसील येथील पुरवठा विभागाकडून अहवाल प्राप्त झाला आहे. या अहवालामध्ये तो तांदूळ सार्वजनिक वितरण प्रणालीचा आहे, हे स्पष्ट करता येणार नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे त्या तांदुळाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल.- हणमंत डोपेवाड, पोलीस निरीक्षक, पातूर.

तपासणीत काय आले आढळून ?
सरकारी स्वस्त धान्य दुकानांची नियमित तपासणी करणे अपेक्षित असते. सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत धान्य पात्र लाभार्थ्यांना पूर्ण वेळेवर मिळते कि नाही, यासह अन्य बाबी समाेर येतात. मात्र आता याप्रकरणाच्या निमित्ताने नियमित तपासणी झाली काय, झाली असल्यास काेणत्या बाबी आढळून आल्या हाेत्या, त्यावर प्रशासनाने काेणती कार्यवाही केली, यासह अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.

तरही प्रकार थांबेनात
पातूर तालुक्यात यापूर्वीही रेशनचा तांदूळ, गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेताना पकडण्यात आला हाेते. याप्रकरणी गुन्हेही दाखल करण्यात आले. मात्र त्यानंतरही रेशनचा काळाबाजार थांबत नसल्याचे दिसून येत आहे.

Gajanan Gawai
Gajanan Gawai
गजानन गोपाळराव गवई हे एक महाराष्ट्रीयन पत्रकार असून महाव्हॉइस न्यूज या प्रसिद्ध मराठी बातम्या आणि मीडिया वेब पोर्टलचे दूरदर्शी संस्थापक आणि मुख्य संपादक आहेत. निःपक्षपाती वार्तांकनासाठीची त्यांची बांधिलकी आणि मीडिया उद्योगाची आवड यामुळे 2017 मध्ये Mahavoice News ची स्थापना केली, जे लाखो वाचकांसाठी माहितीचा विश्वसनीय स्रोत बनली आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: