पातुर – निशांत गवई
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बेलुरा फाट्यावर पोलीस असल्याची बतावणी करून दोन अज्ञात इसमाने एका मोटरसायकल स्वाराचा मोबाईल सह मोटरसायकल सह पोबारा केल्याची घटना झाल्यावरून पातुर पोलिसांनी 25 डिसेंबर 2023 रोजी पातुर पोलिसात गुन्ह्याची नोंद करून गुन्ह्याचा तपास सुरू केला होता.या घटनेबाबत ओम गजानन मोहरूत वय 21 वर्ष राहणार पेटकरवाडी वाडेगाव यांनी पोलिसात तक्रार दिली.
या तक्रारी मध्ये त्यांनी 23 डिसेंबर 2023 रोजी रात्री अंदाजे 7:45 वाजता चे दरम्यान ओम गजानन मोहरुत हा जेवण करण्याकरता आशीर्वाद ढाबा बाभुळगाव कडे मोटरसायकल क्रमांक एम एच 30 ए एच 5282ने येत असताना बेलुरा फाटा जवळ दोन इस् मानी हात दाखवून थांबविले व आम्ही पोलिस आहोत अशी बतावणी करून तुझा मोबाईल आमच्याकडे दे म्हणून विवो कंपनीचा मोबाईल किंमत 5 हजार रुपये त्यांच्याकडे दिला त्यांनी मोबाईल मध्ये चेक केले आणि सांगितले की आम्ही पातुर पोलीस स्टेशनला तुझी मोटरसायकल घेऊन जातो म्हणून मोटरसायकलवर मोबाईल सह मोटर सायकल घेऊन निघून गेले अशी तक्रार दिल्याने यामध्ये मोटरसायकल व मोबाईल किंमत 30 हजार रुपयांचे नुकसान झाल्याने यामध्ये यातील दोन अज्ञात इसमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
यामध्ये पाच हजार रुपये मोबाईल आणि मोटरसायकल किंमत 25000 असा एकूण 30000 मुद्देमाल नुकसान झाल्याचे नमूद केल्याने यामध्ये कलम 419 ,34 नुसार गुन्हा दाखल केला आहे यामध्ये ठाणेदार किशोर शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नवघरे संबोधी इंगळे, श्रीकांत पातोंड, ज्ञानेश्वर चिकटे, संजय पांडे, वाकोडे यांनी कसून तपास केला असून यामुळे या गुन्ह्यातील चार आरोपींना अटक करण्यात मिळाले आहे.
या गुन्ह्यातील संशयित आरोपी श्याम गजानन जुमडे वय 24 वर्ष राहणार देगाव, दिनेश चंद्रभान कुकडे वय पंचवीस वर्ष राहणार बेलुरा खुर्द, संतोष विष्णू तायडे व तीस वर्ष राहणार खुर्द, रईस इकबाल मोहम्मद रफीक वय 34 भगतवाडी अकोला यांना आज 21 फेब्रुवारी 2024 चे दुपारी तीन तिचे दरम्यान ताब्यात घेण्यात आले आहे आहे.
यातील संशयित आरोपी जळून पुण्यात वापरलेली पल्सर 80 हजार तसेच मोटरसायकल दुसरी स्प्लेंडर हिरो 40000 आणि मोटरसायकल स्प्लेंडर हिरो 30000 अशा एक लाख पन्नास हजार रुपयाचा मुद्देमाल संशयित आरोपी जवळून जप्त करण्यात आला आहे.