पातूर – निशांत गवई
झाडे लावा झाडे जगवा असे राज्य शासनाच्या संकल्पने नुसार पातुर तालुक्यातील खेट्री येथील सरपंच जहुर खान यांनी पुढाकार घेऊन रोजगार हमी योजनेअंतर्गत चार दिवसात चार हजार वृक्षाची लागवड केली आहे.
झाडे लावा झाडे जगवा या मोहिमे अंतर्गत खेट्री येथे स्थानिक प्रशासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत चार हजार झाडे लावण्यात आली आहे. यावेळी सरपंच जहुर खान ,सचिव राजेश जटाले, रोजगार हमी योजनेचे तालुकाध्यक्ष तसावर खान,
रोजगार सेवक शेख उस्मान, पोलीस पाटील भगवंत ताले, सदस्य शेख साजिद, सदस्य मो. रईस, सुमय्या बी, आम्रपाली तिडके, व गावातील मो. सलीम, प्रमोद पजई, बाळू ताले,आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
या वर्षी रोजगार हमी योजने अंतर्गत चार दिवसात चार हजार वृक्षाची लागवड केली आहे.पुढील वर्षी १० हजार वृक्षाची लागवड करण्याचा संकल्प आहे.
जहूर खान सरपंच खेट्री
झाडे लावा झाडे जगवा शासनाच्या या संकल्पने नुसार प्रत्येक व्यक्तीने एक झाड लावण्याची गरज आहे. यासाठी आम्ही गावात आव्हान करीत अहो. तसावर खान तालुकाध्यक्ष रोहयो पातूर