पातुर – निशांत गवई
पातुर तालुक्यातील शिरला ग्रामपंचायत ही मोठी ग्रामपंचायत असून यामध्ये ग्रामपंचायतचे लाखो रुपयाचे उत्पन्नाचे स्तोत्र असतानाही ग्रामपंचायतच्या हद्दीमधील दिव्यांग व्यक्तींना अद्याप पर्यंत अनुदन न दिल्याने आज ग्रामपंचायत सदस्य सागर कढोने यांनी दिव्यांग सह पातुर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले.
शिरला ग्रामपंचायतचे सचिव डिवरे हे नेहमी अनेक कारणाने वादग्रस्त असून हे शिरला ग्रामपंचायत मध्ये नेहमी सदस्य सोबत बेजबाबदारपणे वागतात लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार असलेल्या ग्रामपंचायत ची शासनाकडून अद्याप पर्यंत साधी चौकशी न केल्याने या ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांच्या भ्रष्टाचार झाला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून शिरल्या ग्रामपंचायत च्या हद्दीमधील दिव्यांग व्यक्तींना अनुदान देण्यात आले नाही आजपर्यंत लाखो रुपये ग्रामपंचायत फंड जमा केला व तो इतरत्र खर्च करण्यात आला परंतु दिव्यांगांना अनुदान देण्यात आले नाही याबाबत ग्रामपंचायत सदस्य सागर कढोने यांनी आज ग्रामपंचायत हद्दीतील सर्व दिव्यांग व्यक्ती सह पंचायत समिती परिसरात आंदोलन करून शासनाला जागृत करण्याचा प्रयत्न केला.
या भ्रष्ट ग्रामपंचायतचे सचिव डीवरे यांचा मोबाईल नंबर हा नेहमी स्विच ऑफ दाखवण्यात येते ते नागरिकांना वेळेवर भेटत नाहीत त्यांच्या अनेक तक्रारी झाल्या त्यांना वरिष्ठांच्या आशीर्वाद असल्याने ते मनमानी कारभार करीत आहेत याबाबत ग्रामपंचायत सदस्य लवकरच आंदोलन करनार असल्याचे त्बोयांनी लून दाखविले.
ग्रामपंचायत अंतर्गत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची चर्चा असून ग्रामसेवकाच्या मनमानी कारभारामुळे या ग्रामपंचायतीचा कारभार देवाला असून गटविकास अधिकारी याचे संबंधित ग्रामसेवकाला पाठबळ असल्याची खमंग चर्चा पातुर तालुक्यात असून जिल्हा ग्रामपंचायत कारभाराची जिल्हा परिषद सिओ दादा जिल्हाधिकारी यांनी चौकशी करण्याची मागणी होत आहे.