Monday, December 23, 2024
Homeराज्यडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा पातूर पंचायत समितीला विसर...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीचा पातूर पंचायत समितीला विसर…

पत्रकाराने सोशल मीडियावर पोस्ट केल्याने पं. स. प्रशासनाला जाग

विस्तार अधिकारी यांनी चक्क पायात जोडे घालून केले अभिवादन

पातूर – निशांत गवई

महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रत्येक शासकीय,निमशासकीय कार्यालयात अभिवादन झाले पहिजे असा नियम असतांना पातूर पंचायत समितीच्या कार्यालयात दुपारपर्यंत बाबासाहेबांच्या प्रतिमेला साधा हार देखील टाकण्यात आला नव्हता.

पातूर पंचायत समितीवर वंचित बहुजन आघाडीची सत्ता आहे.आंबेडकरी विचारांच्या पक्ष असलेल्या पदाधिकारी यांनाच बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा विसर पडला असून सकाळपासून पंचायत समितीच्या कार्यालयात बाबासाहेबांच्या प्रतिमेला साधा हारदेखील नसल्याची पोस्ट शोशल मीडियावर एका पत्रकाराने व्हायरल केल्याने संबंधितांना जाग आली व दुपारनंतर सदर कार्यालयात महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

दुपारपर्यंत सदरहू प्रकरणी पातूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी,कर्मचारी यांनी देखील बाबासाहेबांना अभिवादन करण्याची तसदी घेतली नव्हती परंतु बाबासाहेबांच्या नातवाचा पक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीची सत्ता असतांना वंचितचे तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी, पं.स.सदस्य व पं.स.चे अधिकारी यांना बाबासाहेबांच्या पुण्यतिथीचा विसर पडला असता एका पत्रकाराने त्यांना याची जाणीव करून दिल्यानंतर थातुरमातुर अभिवादन केल्याने व पंचायत समितीच्या अनंत लव्हाळे नामक विस्तार अधिकाऱ्याला पायातील जोडे काढण्याचा देखील वेळ नसल्याने संबंधितांचा बेजबाबदार पणा दिसून आला.यावेळी घडलेल्या प्रकाराने वंचित बहुजन आघाडीचे सामान्य कार्यकर्ते व आंबेडकर विचारांच्या अनुयायांमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून कमालीचा रोष व्यक्त झाला.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: