शिवसेनेचा हिरमोड तर वंचितने बालेकिल्ला घेतला पुन्हा ताब्यात
निशांत गवई, पातूर
पातूर : रविवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी पातुर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतीपदाचे निवडणूक पंचायत समिती बचत भवन येथे घेण्यात आली. ईश्वर चिठ्ठ्या या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांकडून निघाले असल्याने पातुर शहरात एकच जल्लोष करण्यात आला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पातुर पंचायत समिती येथे आज रोजी सभापती तथा उपसभापती पदासाठी निवडणूक होती यात शिवसेनेकडून सभापती पदासाठी पंचायत समिती सदस्य सौ मनीषा अजय ढोणे व वंचित कडून सुनीता अर्जुन टप्पे यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते तर उपसभापती पदासाठी शिवसेनेकडून गोपाल ढोरे तर वंचित कडून इमरान खान मुमताज खान यांनी नामांकन दाखल केले होते तर यावेळी पक्षीय बलाबल सहा अधिक सहा झाल्यामुळे ईश्वरचिट्टी काढावी लागली.
यात वंचित बहुजन आघाडीच्या सौ सुनीता अर्जुन टप्पे यांची सभापती पदी तर उपसभापती पदी इम्रान खान मुमताज खान यांची ईश्वर चिट्ठीने निवड झाल्याने सभापती व उपसभापती पदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली त्यामुळे पुन्हा वंचित ने बालेकिल्ला ताब्यात घेतला असून शिवसेनेचा हिरमोड झाला यावेळी पिठासिन अधिकारी म्हणून पातुर तहसीलचे तहसीलदार दीपक बाजड तथा नायब तहसीलदार विजय खेडकर गटविकास अधिकारी उल्हास मोकळकर आदींनी काम पाहिले.
यावेळी वंचित चे तालुकाध्यक्ष डॉ. ओमप्रकाश धर्माळ मंगेश गोळे, दिनेश गवई,माजी तालुकाध्यक्ष किरण सरदार,राजेंद्र इंगळे,मंगला इंगळे चंद्रकांत तायडे हरिभाऊ इंगोले , चरणसिंग चव्हाण,राजू बोरकर नितीन हिवराळे, शैलेंद्र गुडदे आधीसह तालुक्यातील वंचित चे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विजयी उमेदवार यांना शुभेच्छा देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, मनोहर बेलोकर, मनोज गवई, धम्मदीप इंगळे आदी. उपस्थित होते