Thursday, October 24, 2024
Homeराज्यपातूर | दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर...

पातूर | दुचाकीच्या अपघातात एक ठार; दोन गंभीर…

पातूर-वाशिम रोडवरील घटना

पातूर – निशांत गवई

पातूर ते वाशिम रोडस्थित असलेल्या पातूर घाटात रोडचे काम करीत असलेल्या मजुराला एका दुचाकीची जोरदार धडक झाल्याने दुचाकीस्वार ठार झाला असून एक गंभीर जखमी तसेच रोडचे काम करीत असलेल्या मजुरासही गंभीर ईजा झाल्याची घटना घडली आहे.

पातूर पासून वाशिमकडे जाताना सुमारे 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या पातूर घाटात आज दि.१६/१०/२०२३ रोजी दुपारी सुमारे दीड वाजताच्या दरम्यान मोंन्टेकारलो कंपनीचा मजूर रोडवर काम करीत असताना हिंगोली कडून अकोल्या कडे जात असलेल्या दुचाकी क्रमांक एम.एच ३० बी एस ६२७१ सदर मजुरास जोरदार धडक दिली यात अभिषेक संतोष खाडे (वय १९) रा.खडकी दुचाकीस्वार हा जागीच ठार झाला महेश बबनराव घुगे रा.हिंगोली हे गंभीर जखमी झाले रस्त्याचे काम करीत असलेल्या मजुराला देखील गंभीर ईजा झाली असून वृत्त लिहिस्तोवर जखमी मजुराचे नाव समजू शकले नाही.

सदर घटनेची माहिती मिळताच पातूर पोलीस स्टेशनचे ट्रॅफिक जमादार ठाकूर,चिकटे मेजर,पोलीस चालक अनिल अंभोरे,पचपोर मेजर,दिगोडे मेजर,अभिजित आसोलकर,पत्रकार दुले खान यांनी जखमीस पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना केले सदर चि माहिती सूत्रंकडून मिळाली असून पुढील तपास पातूर पोलिस करत आहे

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: