Friday, November 22, 2024
Homeराज्यPatur News | निलगायीच्या धडकेत शेतमजूर जखमी...

Patur News | निलगायीच्या धडकेत शेतमजूर जखमी…

पातूर – निशांत गवई

Patur News – शेतात काम करीत असताना निलगायीच्या धडकेत दोन शेतमजूर जखमी झाल्याची घटना घडली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. येथुन जवळच असलेल्या पातुर तालुक्यातील दिग्रस बृ येथील शेतमजूर बेचाळीस वर्षीय प्रफुल्ल अंभोरे तसेच पस्तीस वर्षीय सत्यम अंभोरे शेतात काम करीत असताना अचानक निलगायीचा मोठा कळप सुसाट वेगाने धावत येऊन संमधीत शेतमजूर यांना धडक दिली.

त्यामुळे प्रफुल्ल अंभोरे गंभीर जखमी झाले आहेत तर सत्यम अंभोरे सुध्दा किरकोळ जखमी झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे तर जखमी शेतमजूर यांना वाडेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे आणले असता त्यांच्या वर प्राथमिक उपचार करून पुढील उपचार संदर्भात अकोला येथे हलविण्यात आले आहे तर अलीकडच्या कालावधीत शेतकरी शेतमजूर यांच्यावर वन्य प्राणी यांच्या कडून प्राणघातक हल्ले होत असल्याने परिसरातील मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण पसरले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे त्यामुळे वन विभागाने या शेतकरी शेतमजूर यांच्या या गंभीर समस्येकडे लक्ष देवून वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी करण्यात येत आहे.

वन्य प्राणी यांचे मोठ्या संख्येने कळप मुक्त संचार करताना दिसतात त्यामुळे शेतात मशागतीची कामे करणे खुपच कठीण आहे आहे त्यामुळे वन विभागाने वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.

प्रविण सुरेश लोखंडे
शेतकरी

खरीप हंगामातील सोयाबीन पीक जवळपास अंतिम टप्प्यात येत आहे शेत शिवारात वन्य प्राणी यांची संख्या खूपच मोठी असुन वन्य प्राणी यांच्या दहशतीमुळे शेतात मशागतीची कामे करणे कठीण झाले आहे. त्यामुळे वन्य प्राणी यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभाग लक्ष देईल का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

सागर सरप
शेतकरी वाडेगाव

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: