निशांत गवई, पातूर
पातूर : पातुर पासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर असलेल्या व अत्यंत वर्दळीच्या रस्त्यात नांदखेड फाट्याजवळ आज गुरुवार दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली.
शिर्ला ते चिखलगाव दरम्यान जंगलाचा भाग जरी नसला तरी पण वन्य प्राण्यांचा वावर मात्र मोठ्या प्रमाणात आहे अनेक वेळा रस्ता ओलांडताना हरीण,नीलगाई व रानडुक्कर असे अनेक वन्यजीव रस्ता पास करताना अनेक छोटे-मोठे अपघात झालेले आहेत तर प्राण्यांमुळे अपघात होऊन काहींनी आपले जीव सुद्धा गमावले आहेत आजही त्याच गोष्टीची पुनरावृत्ती होऊन बिबट्याला रस्ता पास करताना अज्ञात वाहनाने धडक देऊन जागीच ठार केले आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग पातुरचे गव्हाणे साहेब वनाधिकारी व त्यांच्या सहकार्यांनी घटनास्थळ गाठून मृत बिबट्याला अकोला येथे रवाना केले.
घटनेची पुढील कार्यवाही काय झाली ही मात्र घटना लिहिस्तोवर कळू शकली नाही परंतु वन्य प्राण्यांसोबतच पाळीव प्राणी सुद्धा या रोडवर असलेल्या डीवाईडर वर लोक आपली जनावरे चारताना दिसतात व त्यामुळे सुद्धा अनेक छोटे-मोठे अपघात होत राहतात या सर्व अपघातांच्या घटनांना आळा घालण्यासाठी व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने ताराचे कुंपण करणे गरजेचे आहे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. सदर घटनेचा पुढील तपास वनविभाग पातूर करत आहे