पातूर : वनविभाग कार्यालय पातूर अंतर्गत येत असलेल्या बोडखा भाग 2 मधील चिंचखेड कॅनॉल मधून अवैध रित्या सागवान वृक्षतोड करीत असल्याचे आढळून आले असता वनविभागाने कारवाई करून सदर सागवान जप्त केले आहे.
दि.२३/०६/२०२३ रोजी पहाटे ०३.३० वाजता एन. वाय. गवळी, वनपाल माळराजूरा, एन. डी. डाखोरे, वनरक्षक बोडखा भाग-२ आणि ए. व्ही. राठोड, वनरक्षक माळराजूरा भाग – १ वाहनचालक विलास ईनामदार व ईतर रोजंदारी
मजुर हे रात्री गस्त करित असतांना त्यांना बोडखा भाग – २ मधील चिंचखेड कॅनाल मध्ये काही संशयीत आरोपी अवैध रित्या वृक्षतोड करुन वाहतूक करित असल्याचे दिसून आले.
त्यांना सायकल वर वाहतूक करित असतांना त्यांचा पाठलाग केला, परंतू सदर आरोपी हे अंधाराचा फायदा घेत पसार झाले. त्यांचे कडील ०८ नग सागवान चिराण माल आणि दोन सायकल असा एकूण रु.२१३१२/चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वनगुन्हा क्रमांक ०१५८१/३९५०५ दि. २३/०६/२०२३ जारी करुन पुढील तपास एन.वाय. गवळी, वनपाल माळराजूरा हे करित असून आरोपीचा शोध घेणे सुरु आहे.
सदर कार्यवाही हि के. आर. अर्जुना, उपवनसंरक्षक अकोला, मा.सु.अ. वडोदे, सहाय्यक वनसंरक्षक ( भ.व.) अकोला आणि एस. डी. गव्हाने, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पातूर यांचे मार्गशनाखाली पार पडली. तसेच पातूर वनपरिक्षेत्रामधील जनतेस आवाहन करण्यात येते की, आपणांस राखीव वनामध्ये कोणी अवैध रित्या प्रवेश करित असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पातूर यांना किंवा त्यांचे कार्यालयास कळवावे.