पातूर – निशांत गवई
पातूर दि.१६ मार्च, २०२४ रोजी बाळापूर रस्त्यानजिक स्व. वसंतराव नाईक महाविद्यालया जवळ एक संशयित व्यक्ती सायकलवर सागवान चौरस नग घेवून भिमनगर भागाकडे जातांना गस्तीवर असलेल्या श्री.एस.डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पातूर व श्री.व्ही.वी. सोनुने, वनरक्षक पातूर बिट यांना दिसून आल्याने त्यांनी मोटारसायकल संशयित अरोपीच्या जवळ नेली.
आरोपीने वनकर्मचान्यांना पाहताच सांगवान माल रचलेली सायकल वनकर्मचाऱ्यांच्या गाठीवर ढकलून तेथून पलायन केले. यामध्ये वनकर्मचान्यांना किरकोळ दुखापत झाली असून आरोपी गल्लीबोळांतील रस्त्यांचा फायदा घेवून पसार झाला. सदर आरोपीस वनकर्मचारी यांनी ओळखले असून सदर इसमाचे नाव अतुल उमाळे असे आहे.
सदर कार्यवाही दरम्यान सागवान चौरस नग १० घ.मी.०.०७७ किमत रु.७२४३/- व १ सायकल अंदाजे रु.१५००/- असा एकूण रु.८७४३/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून वनगुन्हा क्रमांक ०१५८६/०६/२०२४ दि.१६/०३/२०२४ अन्वये वनगुन्हा जारी करण्यात आला असून मा.श्री. कुमारस्वामी एस.आर. उपवनसंरक्षक अकोला, मा.श्री.सु.अ. बडोदे, सहाय्यक वनसंरक्षक (म.व.) अकोला व श्री.एस.डी. गव्हाणे, वनपरिक्षेत्र अधिकारी (प्रा.) पातूर यांचे मार्गदर्शनाखाली श्री.पी.डी. पाटील, वनपाल पातूर है पुढील तपास करत आहेत.
आरोपी अतुल उमाळे हा यापूर्वी देखील सागवान लाकडाची तस्करी करतांना बनकर्मचाऱ्याऱ्यांना गुंगारा देवून निसटला असून त्यावर सागवान तस्करीचे अनेक गुन्हेदेखील दाखल आहेत. सदर आरोपीचा शोध घेणे सुरू असून सदर आरोपी आढळून आल्यास वनविभागाच्या टोल फ्री नंबर १९२६ वर संपर्क साधण्याचे आवाहन याव्दारे करण्यात येत आहे.