पातुर – निशांत गवई
पातुर तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अल्पसंख्याक कांग्रेस कमिटीचे सचीव हाजी कमरोद्दीन यांच्या नेतृत्वात कांग्रेस नेते हाजी सैय्यद बुरहान ठेकेदार यांच्या अध्यक्षतेखाली मा तहसीलदार पातुर यांचे मार्फत देशाच्या महामहिम राष्ट्रपती महाराष्ट्र राज्य चे राज्यपाल मा मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य चे विरोधी पक्ष नेते यांनी निवेदनाद्वारे मांगणी करण्यात आले की जालना जिल्ह्यात अंतरवाली सराटी या गावात मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मराठा समाजाला आरक्षण मिळावेया साठी उपोषणाला बसले होते या उपोषणक्रत्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
या घटनेचे पातुर तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे वतीने निषेध नोंदण्यात आले तसेच केंद्रीतील सरकार ने ५० टक्के आरक्षणाची अट शिथील करून मराठा, मुस्लिम, कुणबी व इतर समाजाला आरक्षण द्यावे जेणे करून वरील प्रमाणे घटना घडणार नाही व समाजाला न्याय मिळेल करीता सदर निवेदनाची दखल घेऊन सहानुभूतीपु्र्वक विचार करून आरक्षणाचा मार्ग गंभीरतेने घेवून मराठा समाजाला न्याय देणयाची कृपा करावी अशे निवेदनात म्हंटले आहे.
निवेदन देते वेळी कांग्रेस नेते हाजी सै बुरहान ठेकेदार हाजी सै कमरोद्दीन, पातुर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुख्तार शे अहमद तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश भाऊ गावंडे,बब्बु भाई,सै अजहरोद्दीन, मोहसीन खान, मुख्तार भाई,दौलतराव घुगे,सै आसिफ जागीरदार, हरी भाऊ चोपडे,रमेश सोळंके, मनोहर वगरे, शेख सलीम आलेगाव,बंटी गहिलोत, अजय ठाकरे, मो अलीम ,संजयसिंह चौव्हाण,विजय गोतरकर,संदीप देशमुख,सतीश मारोळकर,सह तालुक्याती पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.