Monday, December 23, 2024
HomeBreaking Newsपातूर | एसीबीकडे तक्रार झाल्याने "त्या" दोघांचे धाबे दणाणले...वृक्षाचे देयक काढण्यासाठी पैशे...

पातूर | एसीबीकडे तक्रार झाल्याने “त्या” दोघांचे धाबे दणाणले…वृक्षाचे देयक काढण्यासाठी पैशे स्वीकारल्याचे प्रकरण…

निशांत गवई, पातूर

पातूर : वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी पातुर पंचायत समितीचे अभियंता व संगणक चालक या दोघांनी एका रोजगार सेवकाकडून फोन पेवर पैशे स्वीकारल्या बाबतची तक्रार रोजगार सेवकाने ६ सप्टेंबर रोजी लाच लुचपत विभाग, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्याकडे दिलेल्या तक्रारीतून केला आहे. त्यामुळे अभियंता व संगणक चालक या दोघांचे धाबे दणाणले असून, सदर प्रकरण आपसात मिटविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहे. वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी पैशाची मागणी पूर्ण न केल्यास देयक हेतूप्रस्पर थांबविले जातात, त्यामुळे दबावापोटी वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी रोजगार सेवकाने फोन पे वर पैशाची मागणी पूर्ण केली असा आरोप रोजगार सेवकाने दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

अभियंता व ऑपरेटर यांच्या खात्याची चौकशी करा !
पातुर तालुक्यात लाचखोरीमुळे वृक्ष लागवडीच्या मोहिमेचा फच्चा उडाल्याचे चित्र आहे. वृक्ष लागवडीचे देयक काढण्यासाठी अभियंता व ऑपरेटर यांनी किती लोकांकडून पैशे स्वीकारले याबाबत दोघांच्या खात्याची चौकशी केल्यास मोठे गोडबंगाल समोर येण्याची दाट शक्यता आहे.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: