पातूर – निशांत गवई
पातुर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या ग्राम देऊळगाव या गावामध्ये एकाच समाजाचे एकाच कुटुंबामध्ये असलेल्या दोन गटात हाणामारीची घटना काल सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान झाली असून यामध्ये एक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे. यामध्ये पातूर पोलिसात दोन्ही गटाचे फिर्यादीच्या तक्रारीवरून परस्पराविरुद्ध पातुर पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
यामध्ये परमेश्वर अशोक ऊपरवट वय 20वर्ष राहणार देऊळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी भीमराव उपर्वट, दिनकर उपरवट, मंगेश उपरवट, वासुदेव उपरवट यांच्याविरुद्ध कलम 324 323 504 506 34 भादवी अशा गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.
तर मोहन सोनाजी ऊपरवट वय 65 वर्ष राहणार देऊळगाव यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी परमेश्वर अशोक उपरवट, प्रवीण अशोक उपरवट, रामेश्वर अशोक उपरवट, मिलिंद भीमराव उपरवट या चार जनाविरुद्ध कलम302 326 323 504 34 भादवी नुसार पातुर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यातील दोन्ही गटामध्ये झालेल्या भांडणाची पार्श्वभूमी जुन्या वादाचे कारण असल्याचे पोलीस सूत्राकडून समजले असून सदर प्रकरणांमध्ये पातुर पोलिसांनी यातील 4 आरोपींना अटक केली असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे.
सदर प्रकरणांमध्ये मंगेश उपरवट यांना जबर मार लागल्याने त्यांच्यावर अकोला येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे यामध्ये अधिक तपास पातूर ठाणेदार किशोर शेळके करीत असल्याची माहिती पोलीस सूत्राकडून प्राप्त झाली आहे