पातुर : तालुक्यातील ग्राम आस्टुल येथे गेल्या पंधरा वर्षाची परंपरा कायम ठेवून आसटुल भीम ज्योत बुद्धविहार येथे १६वया वर्षी सुद्धा दरवर्षी तारखेप्रमाणे ११/११/ शनिवार रोजी आसटुल तालुका पातुर येथे बुद्ध मूर्ती स्थापना वर्धापन दिन समारंभाचा कार्यक्रम प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक अंजली आंबेडकर सुजात आंबेडकर आदरणीय पूज्य भते बुद्धपालजी यांच्या उपस्थित समारंभ होईल.
दरवर्षीप्रमाणे मूर्ती स्थापनाला वर्धापन समारंभाला लाखोच्या संख्येने बौद्ध उपासक उपासिका यांची उपस्थित लाभते या कार्यक्रमाची सूची सकाळी ८ वाजता धम्म ध्वजारोहण त्रिशरण पंचशील व परित्राण पाठ दुपारी १.३० वाजता प्रमुख वक्ते यांचे मार्गदर्शनाखाली होईल दुपारी ३.३० वाजता भव्य दिव्य भोजन दानाचा कार्यक्रम होईल व दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सायंकाळी ७ वाजता प्रबोधनकार संदीप पाल महाराज सत्यपाल महाराजांचे शिष्य यांचा प्रबोधनाचा सतर्क वाणीतून पंचरगी कार्यक्रम होईल.
या कार्यक्रमाला राजेंद्र पातोडे संगीता अढाऊ जि प अध्यक्ष आम्रपाली खंडारे जिल्हा परिषद सभापती मायाताई नाईक योगिता रोकडे रिझवाना परवीन प्रमोद देंडवे, जिल्हा अध्यक्ष मिलिंद इंगळे संतोष हुसे सिद्धार्थ सिरसाट दिनकर खंडारे ओमप्रकाश धर्माळ सुनीता टप्पे इमरान खान ज्ञानेश्वर सुलताने परभाताई शिरसाट पुष्पाताई इंगळे शरद सुरवाडे संजू लोखंडे सावित्रीबाई राठोड सुनील फाटकर जिल्हा उपाध्यक्ष यांची उपस्थिती राहील या कार्यक्रमाला विशेष सहकार्य बोधिसत्व प्रबोधन संस्था आसटुल व महामाया उपासिका संघ बुद्ध शासन तरुण संघ ऑस्टुल यांचे लाभेल