पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या शेकापूर येथील घटना!…मृतक महिलेने पातूर पोलीस ठाण्यात तीन वेळा तक्रार दाखल करूनही ठोस कारवाई न केल्याने,मुलांच्या डोक्यावरील छत्र गेले.
निशांत गवई, पातुर
पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असलेल्या, मौजे शेकापूर (राम नगर) ता.पातूर जिल्हा अकोला,येथे 13ऑक्टोबरच्या सकाळी 5 वाजता दरम्यान दारुड्या पतीने आपल्या पत्नीची तिचा डोक्यावर,मानेवर आणि पायावर कुऱ्हाडीचे घाव घालून निर्घृणपणे हत्त्या केल्याची घटना घडली. गोपीचंद राजाराम चव्हाण वय 35 वर्षे, रा.शेकापूर जिल्हा अकोला असे आरोपीचे नांव आहे,तर संगीता गोपीचंद चव्हाण वय 28 वर्षे असे हत्त्या झालेल्या दुर्दैवी महिलेचे नांव आहे.
या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,आरोपी गोपीचंद आणि संगीताचा विवाह 8 वर्षांपूर्वी झाला होता.काही दिवस संसार सुरळीतपणे सुरू असतांना गोपीचंदला दारूचे व्यसन लागलं. त्यामुळे दोघांच्या मध्ये वाद होत असत,नेहमी नेहमी दारू पिऊन गोपीचंद हा सांगितला मारहाण करीत तिच्यावर संशय घेत असल्याने, तिने पातूर पोलीस ठाण्यात गोपीचंद विरोधात तीन वेळा तक्रारीसुद्धा दिल्या होत्या, परंतु पातूर पोलिसांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नाही,शेवटी संगीताचे गावातच माहेर असल्याने ती आपल्या अर्जुन आणि अंशुमन या दोन मुलांसह माहेरी राहत होती.
तडजोडी अंती ती गोपीचंद सोबत नांदायला आली होती.शेवटी 12 ऑक्टोबर च्या रात्री त्यांच्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले होते. रात्री झोपी गेल्यावर गोपीचंद सकाळी 5 वाजता झोपेतून उठला आणि कुऱ्हाडीने संगीताच्या डोक्यात, मानेवर आणि पायावर घाव घालून संगीताची क्रूरपणे हत्त्या केली.पातूर पोलिसांनी संगीताचे वडील रामचंद्र देवा राठोड,रा शेकापूर ता.पातूर जिल्हा अकोला यांच्या तक्रारी वरून खुनाच्या गुन्ह्यासह विविध कलमाखाली गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आली आहे.
गोपीचंद चव्हाण याच्या विरोधात सासरे रामचंद्र राठोड यांना मारहाण केल्याने कलम 325 कलमाखाली, आणि शेता शेजारी असणाऱ्या व्यक्तीला मारहाण केल्याप्रकरणी 324 कलमाखाली गुन्हे दाखल आहेत.एकंदरीत गोपीचंद चव्हाण याची गुन्हेगारीची पार्श्वभूमी असूनही, मृतक संगीताने तीन वेळा तक्रारी दाखल करून सुद्धा कारवाई केली नसल्याने, तीला आपला जीव गमवावा लागला पातूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यानी डोके वर काढले आहे.हे तत्कालीन पालक मंत्री बच्चू कडू यांनी वेषांतर करून गुटका माफियांचा पर्दाफाश केला होता, त्यानंतर अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाच्याझालेल्या विविध कारवाया वरून पातूर पोलिसांचा कर्तव्यावतील कसूरपणा चव्हाट्यावर आला असून,संगीताने दिलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेतली असती तर तिला जीव गमवावा लागला नसता,असा सूर जनतेतून येत आहे, याबाबत जिल्हा पोलिस अधीक्षक काय कारवाई करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.