Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedपातूर | पिपळडोळी येथे घराला भिषण आग लाखो रुपयाचे घरातील इलेक्ट्रॉनिक्स सामान...

पातूर | पिपळडोळी येथे घराला भिषण आग लाखो रुपयाचे घरातील इलेक्ट्रॉनिक्स सामान तसेच शेतमाल जळून खाक..!

पातूर – निशांत गवई

पातूर तालुक्यातील पिपळडोळी येथील महादेव अडागळे यांच्या घराला शॉट सर्किट मुळे आग लागली असून त्यामध्ये गहू हरभरा सहज शेतमाल इलेक्ट्रिक सामान जळून खाक झाले आहे.पातुर तालुक्यातील पिंपडोळी हे गाव पातुर पासून 40 किलोमीटर अंतरावर असून या गावांमध्ये घराला आग लागल्याने घरातील संपूर्ण मालमत्तेचे नुकसान झाले आहे. कुठलीही जीवित हानी झाली नाही अशी माहिती प्राप्त होत आहे. महादेव अडागडे यांचे मालकीचे आहे तर इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचे समोर येत आहे.

पातूर येथून नगरपरिषद अग्निशामक विभागाने आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशामक दलाचे मोटर चालक अशफाक खान यांनी माहिती दिली आहे. पातुर नगरपरिषद चे अग्निशामक विभागाचे कर्मचारी प्रल्हाद गवई यांनी आग आटोक्यात आणण्याकरिता परिश्रम घेतले. तर दुसरीकडे आग लागताच गावकऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. या आगीमुळे महादेव अडागडे यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: