निशांत गवई, पातुर
पातूर :आलेगाव वनविभाग अंतर्गत येत असलेल्या वाडेगाव दिग्रस बु परिसरात माकडाचा हैदोस मूळे आठ दिवसात पाच ते सहा जखमी झाल्याची घटना घडली आहे.या मध्ये एका वाहनांचे नुकसान झाल्याची घटना ९ सप्टेंबर शनिवार व सोमवार रोजी घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिग्रस बु येथील रमेश ताले हल्ल्यात जखमी होऊन ते खाजगी दवाखान्यात उपचार घेत आहेत.तसेच शिवा ताले हे शेतातून चक्कर मारल्यानंतर दुचाकी ने घरी येत असताना त्यांच्या दुचाकीवर माकडाने हल्ला केल्याने एकजण गँभिर जखमी केल्याची घटना घडली.तसेच बुधवार रोजी सस्ती येथील मिस्त्री शेख जुबेर शेख रसूल वय ३५,शेख उबेद वय ३२ आदी जखमी झाल्याची घटना घडल्या आहेत.काही जखमींना या वेळी सामजिक युवा कार्यकर्ते आकाश गवई,सोनू पाटील आदींनी त्यांना मदत करून उपचारासाठी रुग्णालयात पाठविले असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.
तसेच वाडेगाव कडे चारचाकी वाहन जाताना त्यांच्या गाडीवर माकडाने उडी घेऊन गाडीचा काच फुटून चालकाचे चेहऱ्याला छोट्या छोट्या काचाला मार लागला असल्याचे समजले आहे.वृत्त लिहेपर्यत चालकाचे नाव समजले नाही सुदैवाने बाजूला महिला बसली असल्याने महिला व गाडीतील व्यक्ती भयभीत झाले होते.येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी त्यांना धीर देत त्यांना पुढील उपचार करिता पाठविण्यात आले आहे. या परिसरात वाढलेल्या माकडा चा बंदोबस्त करून परिसरा मधील माकड कळप घेऊन जावे अशी मागणी भारत कृषक समाजाचे चेअरमन प्रकाश मानकर,संचालक गोविंद पाटील रोकडे, सागर गवई,सावन गवई,दत्ता ताले,योगेश पाटील,विजय ताले,आदी युवकांकडून करण्यात आली आहे.. चौकट :कोणत्याही वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात व्यक्ती जखमी झाल्यास त्यांनी वनविभागाकडे ४८ तासात कळवावे जनेकरून त्यांच्या पंचनामा करून वरीष्ठ कडे अवहाल पाठविण्यात येईल व शासनकडून जखमीस मदत मिळते.आता पर्यत कोणीही कार्यालयात आले नसून जखमी व्यक्तींनी तत्काळ सर्पक साधावा.
एस डी गव्हाणे
प्रभारी वनपरिक्षेत्र अधिकारी आलेगाव