पातूर : तालुक्यांतील चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत सगळ्यात मोठा आदिवासीं बहुल भाग येतो. पोलिसांच्या योग्य मार्गदर्शनाने विविध गावातील होणारे बारा बाल विवाह पोलीसांच्या समय सुचकतेने मुला मुलींच्या आई वडिलांनी रद्द केले आहेत पोलिसांचे काम पाहाले तर डायरेक्ट लग्न चालू असताना रेड करुन बाल विवाह करणाऱ्या आई वडीलावर आणि नातेवाईकावर गुन्हे दाखल करुन त्यांना अटक करणे.
मात्र या प्रकरणामध्ये पोलिसांनी तसे न करतां पोलिसांना काही बाल विवाह होणारं असल्याची महिती मिळाली. असता तोच चांन्नी पोलिस स्टेशन चे ठाणेदार योगेश वाघमारे उपनिरिक्षक गणेश महाजन यांनी काहि परिवरांना थेट त्यांचे घरी जाऊन पोलिस स्टेशन येथे बोलाऊन त्यांना बाल विवाह करण्याचे काय तोटे आहेत. बाल विवाह केल्याने मुलीवर काय परिणाम होतात. त्यांचे सह कोणावर गुन्हे दाखल होउ शकतात त्या मुळे समाजातील बाल विवाह केल्यामुळे मोठी बदनामी होते. अश्या प्रकारचे मार्गदर्शन पोलिसांनी आई वडिलांना केलें.
तर काहींच्या घरी जाऊन त्यांना बाल विवाह न करण्याचे त्यांनी प्रत्येक गावातील मुलाना व मुलींना सांगीतले प्राथमिक महिती नुसार चान्नी पोलिस स्टेशन अंतर्गत येत आलेल्या काही गावांमध्ये तारीख काढून पत्रिका छापून बारा बाल विवाह होत असलेले आई वडिलांना ठाणेदर योगेश वाघमारे यांनी मार्गदर्शन केल्याने रद्द केले आहेत. त्या मुळे परिसरातील नागरिकाकडून पोलिसांनी कार्यवाही न करतां योग्य मर्गदशन केल्याने बाल विवाह थाबले आहेत त्या मुळे पोलिसांचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात येतं आहे.
आम्हाला काही बाल विवाह होत. असल्याची महिती मिळाली होती. त्या मुळे लग्नाच्या अगोदर आई वडिलांना मुला मुलींना बोलाऊंन योग्य मार्गदशन केलें. व त्यांनी सुद्धा लग्न न करण्याचे ठरविले आहे. बाल विवाह होत आल्याची आम्हाला महिती द्यावी. अम्ही त्यांचे योग्य मार्गदर्शन करू. जेणे करुन त्यांचे वर गुन्हे दाखल होणार नाहीत
योगेश वाघमारे. ठाणेदार पोलिस स्टेशन चान्नी
आम्ही दोघेही नवरा बायको अडाणी असल्याने आम्हाला आमच्या मुलीचे दोन महिने कमी असल्याचे. माहीत नव्हते पोलिसांनी आम्हाला योग्य मार्गदर्शन केले मुलीचे लग्न आम्ही सामोरं दोन महिने नंतर काढले आहे
मुलीचे वडिल
बाल विवाह कराल तर गुन्हा दाखल करण्यात येईल अश्या प्रकारची महिती परिसरातील पोलिसांकडून सागण्यात आली आहे. त्या मुळे प्राथमिक महिती नुसार विविध गावातील बारा परिवारातील लोकांनी पत्रिकाचे वाटप करण्यात आले होते तर. काहींना मंडप सुध्हा टाकला होता. पोलीसांच्या मार्गदर्शनाने बाल विवाह होण्याचे रद्द झाले आहेत.