Monday, December 23, 2024
Homeसामाजिकविविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा - डॉ.नागेश लखमावार...

विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचा रुग्णांनी लाभ घ्यावा – डॉ.नागेश लखमावार…

नांदेड – महेंद्र गायकवाड

स्वतंत्र चा अमृत महोत्सव वर्षानिमित्त राष्ट्रीय अभियान (NHM) व माता सुरक्षित घर सुरक्षित याना अंतर्गत अभियाना अंतर्गत मोफत भव्य मोफत भव्य महाआरोग्य दतचिकित्सा व शुल्यचिकिसा (ऑपरेशन) शिबिराचे आयोजन दि.२९/०९/२०२२ रोजी बिलोली उपजिल्हा रूग्णालय येथे. विविध आजारांवरील मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून बिलोली, नायगाव, धर्माबाद, देगलुरसह परिसरातील सर्व रुग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बिलोली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी केले.

चार दिवस चालणाऱ्या या शिबिरात डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व गुरुगोविंदसिंगजी रुग्णालय नांदेड. व आरोग्य सेवेतील तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांची तपासणी व उपचार केले.रूग्णांची रक्तदाब,मधुमेह,ह्दयविकार, तपासणी व उपचार केली जातील.

शल्यचिकित्सक पात्र रुग्णांची तपासणी करून रक्तदाबहायड्रोसिल (अंडावृद्धि) हॉर्नीया, अपेंडिक्स, गर्भ कॅन्सरचे निदान व पुढील उपचार सर्व प्रकारच्या शरीरावरील गाठीच्या शस्त्रक्रिया शालेय मुलांचे नियोजित शस्त्रक्रिया करण्यात येतील. शस्त्रक्रिया सुसज्ज शस्त्रक्रिया ग्राहत व भुल तज्ञांच्या देखरेखीखाली होतील.

शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना मोफत जेवणाची सोय उपलब्ध आहे. शस्त्रक्रियेनंतर तज्ञ डॉक्टरकडून पुनर्तपासणी व औषधोउपचार करण्यात येतील.२९ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये बिलोली उपजिल्हा रूग्णालयाच्या रुग्णालयांतर्गत तसेच रुग्णालय कार्यक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या उपक्रम व शिबिरांचा सर्वांनी लाभ घ्यावा,असे आवाहन बिलोली उपजिल्हा रूग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ.नागेश लखमावार यांनी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: