खामगांव – भारताचे लाडके पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांच्या परिक्षा पे चर्चा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा याकरीता इयत्ता 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांसाठी सर्जिकल स्ट्राईक व बेटी बचाओ बेटी पढाओ या दोन विषयांवर भव्य़ चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यांतर्गत खामगांव मतदार संघातील 65 शाळा व महाविद्यालयातील एकुण 10735 विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन उस्फुर्त प्रतिसाद देत आपला सहभाग नोंदविला आहे.
या स्पर्धेत सहभाग नोंदविणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांला प्रोत्साहन पर प्रमाणपत्र देण्यात आले. तसेच या स्पर्धेत पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक कमावणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आले.
या वेळी आमदार ॲड आकाश फुंडकर यांचेसह चंद्रशेखर पुरोहित शहराध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष राममिश्रा, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष पवन गरड, अनिताताई डवरे, अनिताताई देशपांडे, शिवानीताई कुळकर्णी, भाग्यश्री मानकर,जान्हवीताई कुळकर्णी, रत्नाताई डिक्क़र, संतोषजी पुरोहित, वैभव डवरे, संतोष टाले माजी सभापती,रोहन जैसवाल, शुभम देशमुख, राहुल जाधव, पवन राठोड, दिनेश वाधवानी, रोशन गायकवाड, परितोष डवरे, पवन डिक्क़र, दिनेश वाधवानी, मयुर भंवर, सौरभ तिडतिडे, याची उपस्थिती होती.