Tuesday, November 5, 2024
Homeराज्यआनंदधाम येथे गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न...

आनंदधाम येथे गुणवंत विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार सोहळा थाटात संपन्न…

परमात्मा एक आनंदधाम रामटेक, पारशिवनी व पत्रकार संघ, रामटेक यांचेतफें आयोजन

रामटेक – राजू कापसे

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर परमात्मा एक आनंदधाम रामटेक, पारशिवनी तथा पत्रकार संघ, रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने आनंदधाम रामटेक/ पारशिवनीचे संस्थापक अध्यक्ष तथा महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व ब्रँड अँबेसेडर लक्ष्मणराव (बाबूजी) मेहर रामटेक यांच्या उपस्थितीत वर्ग १ ते १२ च्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच त्यांच्या पालकांचा गौरव सत्कार सोहळा सोमवार, ३ जुलै २०२३ परमात्मा एक आनंदधाम येथे थाटात पार परला.

यावेळी सदर कार्यक्रमाला विविध राजकियांनी आवर्जन हजेरी लावली होती. सोमवार दि. ३ जुलै ला सकाळी ९ ते १० वाजतादरम्यान हवन पार पडले. यानंतर गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम पार पडला. यानंतर विविध मान्यवरांची भाषणे झालीत. यानंतर सकाळी ११ वाजतापासुन गुणवंत विद्यार्थी व त्यांच्या पालकांच्या सत्कार सोहळ्याला प्रारंभ झाला. यावेळी एकुण ५५० विद्यार्थी पालकांचा गौरव व सत्कार करण्यात आला.

यानंतर मातोश्री भजन मंडळ, रामटेकच्या सिमाताई यांच्या संचाने भजन सादर केले. सरतेशेवटी महाप्रसाद होऊन कार्यक्रमाची सांगता झाली. संचलन सिमाताई नागपुरे यांनी केले तर आभार प्रभुनाथ कोहपरे यांनी मानले. गौरव सत्कार सोहळा कार्यक्रमाला आनंदधाम रामटेक/ पारशिवनीचे संस्थापक अध्यक्ष तथा महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती गौरव पुरस्कृत व ब्रँड अँबेसेडर लक्ष्मणराव (बाबूजी) मेहर, नमो नमो मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष विजय हटवार आणि माजी मंत्री तथा नागपूर ग्रामिण कांग्रेस जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक ,

कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन किरपान , राष्ट्रीय अध्यक्ष बजरंग मेहर, माजी नगरसेवक दामोधर धोपटे, पत्रकार अनिल वाघमारे, माजी नगराध्यक्ष दिलीप देशमुख, सादिक अली कुतुबी, समाजसेविका ज्योतीताई कोल्लेपरा, राहुल कोठेकर, रमेश बिरणवार, सखाराम ठाकुर, नंदकिशोर तांडेकर, ज्योतीताई कामडी, जगत भोयर, देवचंद मेश्राम, कविता राऊत, पुनम बरगट, सोनी पाल, कांचनमाला माकडे, आणि सर्व पत्रकार बंधू रामटेक आदि मान्यवर या सत्कार सोहळ्याला उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आणि सुयोग्य कार्यक्रम पार पडण्यासाठी गुणवंत विद्यार्थी सोहळा समिती आणि गुरुपौर्णिमा उत्सव सोहळा समिती, परमात्मा एक सेवक-सेविका आनंदधाम ,रामटेक यानी अथक परीश्रम घेतले.

Gaurav Gawai
Gaurav Gawai
गौरव गजानन गवई हे महाव्हॉइस न्यूजचे सह-संस्थापक आहेत आणि रायटर आणि ग्राफिक डिझायनर म्हणूनही ते गेल्या पाच वर्षापासून काम करतात. त्यांना महाव्हॉइस न्यूजमध्ये ग्राफिक डिझायनिंग आणि कंटेंट रायटिंगचा मजबूत अनुभव आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: