गणेश तळेकर
प्रत्येकाला कधी ना कधी आवडून गेलेल्या ह्या ओळी .. मला ही होत्या.. आपल्या आई बापूं ना आपला अभिमान वाटावा असं काहीतरी करता आलं पाहिजे असं वाटायचं.. पण फार काही करण्या आधीच वेळ हातातून निघून गेली होती. बापू नीं माझं काम आज पाहिलं असतं तर त्यांना किती बरं वाटलं असतं ही सल माझ्या मनात अगदी आज ही आहे..
पण ह्या सगळ्याची कसर भरून काढली माझ्या दोन्ही मुलांनी..! मोठा तर काम करतच होता परंतु मागच्याच वर्षी माझ्या धाकट्या मुलाचा ही चित्रपट प्रदर्शित झाला, “नाळ २” आणि आज त्याला मिळालेला त्याच्या आयुष्यातला पहीला पुरस्कार, “Special Jury Mention” Bulbul Children’s International Film Festival, Goa – 2024
भार्गव, तुझं खूप अभिनंदन! अभिमान वाटावा असच यश आहे तुझं! तुझा पप्पा म्हणून मला तुझा अभिमान तर वाटतोच, पण आज आपले बापू ही जिथे कुठे असतील, त्यांना ही तुझा अभिमानच वाटत असणार.. त्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत म्हणून आपण आज जिथे आहोत तिथे पोहोचू शकलो..! असाच आणि ह्या पेक्षा खूप मोठा हो..! तुझं भरभरून कौतुक करायची संधी पुन्हा पुन्हा आम्हाला मिळू दे हीच शुभेच्छा