Monday, December 23, 2024
Homeराज्यअन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई विरोधात जिल्ह्यातील पानपट्टी मालकांचा जेलभरो आंदोलनाचा इशारा...

अन्न व औषध प्रशासनाच्या कारवाई विरोधात जिल्ह्यातील पानपट्टी मालकांचा जेलभरो आंदोलनाचा इशारा…

सांगली प्रतिनिधी:– ज्योती मोरे.

सध्या सांगली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने पानपट्ट्यांवर कारवाया केल्या जाऊन पानपट्टी मालकांवर कलम 328 अंतर्गत गुन्हे नोंद केले जात आहेत, त्यामुळे पानपट्टी धारक घाबरून गेलेत.सदर कारवाया वाढताना दिसत असल्याने महाराष्ट्र पान व्यापारी महासंघ आणि सांगली जिल्हा पानपट्टी असोसिएशनच्या वतीने आज दुपारी सांगलीतील आमराई मध्ये जिल्ह्यातील पानपट्टी मालकांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं.

दरम्यान अन्न व औषध प्रशासनाने ताबडतोब या कारवाया थांबवाव्यात. यासह कलम 328 अंतर्गत गुन्हे नोंद करण्यात थांबवावा, अन्यथा जिल्ह्यातील सात हजार पानपट्टी धारक जेलभरो आंदोलन करतील, असा इशारा महाराष्ट्र पान व्यापारी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अजित सूर्यवंशी यांनी यावेळी दिलाय.अन्न व औषध प्रशासनाला कारवाई करायचीच असेल तर ज्या ठिकाणी सुगंधी तंबाखू अथवा इतर सामान तयार होतं तिथं करून त्यांचं वितरण थांबवावं. गोरगरीब पानपट्टी धारकांवर विनाकारण कारवाया करू नयेत. यासाठी आम्ही कोर्टाचीही लढाई लढणार असल्याचं अजित सूर्यवंशी यांनी पुढं बोलताना म्हटलंय.

यावेळी जिल्हाध्यक्ष रत्नाकर नांगरे, महापालिका अध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, जिल्हा खजिनदार राजू पागे, जिल्हा कार्याध्यक्ष युसुफ जमादार, जिल्हा सचिव मकरंद जमदाडे, अशोक कारंडे, राजू खोत, रावसाहेब सरगर ,राजू फोंडे, प्रकाश मोरे, सुरेश जाधव आदी मान्यवरांसह जिल्ह्यातील पानपट्टी मालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: