Monday, December 23, 2024
Homeराज्यसांगली | पंडित दीनदयाळ हे गरिबांचे कैवारी - प्रकाश बिरजे...

सांगली | पंडित दीनदयाळ हे गरिबांचे कैवारी – प्रकाश बिरजे…

सांगली – ज्योती मोरे.

भारतीय जनसंघाचे अध्यक्ष आणि संघाचे प्रचारक दिनदयाळ उपाध्याय हे सतत दीनदुबळे आणि वंचित यांची चिंता करीत असत. विकासाचा ओघ जोपर्यंत गरिबांच्या घरापर्यंत जात नाही तोपर्यंत या विकासाला काही अर्थ नाही असे त्यांचे मत होते. पंडित दीनदयाळजींच्या विचारावर श्रद्धा ठेवून आजची भाजपा त्यानुसार वाटचाल करीत आहे.

असे विचार भाजपाच्या राष्ट्रीय परिषदेचे सदस्य प्रकाशतात्या बिरजे यांनी व्यक्त केले. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या पुण्यतिथी निमित्त ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीरदादा गाडगीळ जनसंपर्क कार्यालयात पंडित दीनदयाळ यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते श्रीकांततात्या शिंदे, नगरसेवक विनायक सिंहासने, सुबरावतात्या, संजय कुलकर्णी सरचिटणीस अविनाश मोहिते शेटे महाराज, रोहित जगदाळे प्रियानंद कांबळे, गौस पठाण शशिकांत टेके, बंडू गुरव, प्रदीप कार्वेकर आदी उपस्थित होते..

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: