Monday, December 23, 2024
Homeराजकीयगाव विकासाकरिता 'पंचसूत्री' महत्त्वाची - आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील...

गाव विकासाकरिता ‘पंचसूत्री’ महत्त्वाची – आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील…

शेर शिवाजी संघटनेतर्फे शिवजयंती महोत्सव साजरा.

डोरली (भा.) येथे विविध कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन.

नरखेड – अतुल दंढारे

गावाचा सर्वांगीण विकासासाठी सर्व ग्रामपंचायतीने पाणी,स्वच्छता,शिक्षण,आरोग्य व पर्यावरण या पाच घटकावर काम करावे.या पंचसूत्रीचा आधारे प्रत्येक गाव सुजलाम सुफलाम होऊ शकते.गावातील आपापसातील वाद तंटे मिटवून गाव विकासासाठी सर्वांनी एकत्रित यावे.गावाचा ‘सरपंच’ महत्त्वाचा घटक असल्यामुळे तो भ्रष्टाचारी नसावा, असे प्रतिपादन आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले.

शेर शिवाजी संघटना, डोरली (भा.) कडुन तिथीनुसार शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात ग्रामस्वच्छता अभियान, भव्य शोभायात्रा, व सांयकाळी ग्रामविकासाचा संकल्प या विषयावर आदर्श सरपंच मा.श्री. भास्करराव पेरे पाटील यांचे ‘जाहीर व्याख्यान’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन माजी आमदार डॉ.आशिषबाबू देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणुन जि.प.सदस्य समीरदादा उमप, संदीपभाऊ सरोदे, प्रविनभाऊ शिंदे, मनिषभाऊ फुके, शेर शिवाजी संघटनेचे संस्थापक सागरदादा राऊत, भूषणजी पुंड, संभाजीराव भांडवलकर, रमेशराव खरबडे, रजुजी वानखेडे, नारेशजी टिकले, सूनिताताई वानखेडे , केने ताई, योगेशजी रेवतकर प्रामुख्याने उपस्थित होते.

सकाळी संपूर्ण गावभर ग्रामस्वच्छता अभियान राबवण्यात आले व सकाळी भव्य शोभायात्रेचे आयोजन केले गेले यात विविध देखावे व जिजामातेच्या वेषभूषेत काजल खरबडे ही शोभायात्रेतील आकर्षणाचे केंद्रबिंदू होते. व सांयकाळी ‘ग्रामविकास संकल्प’ या कार्यक्रमात हजारोच्या संख्येने गावकरी उपस्थित होते.

प्रास्ताविक वैभवदादा काळे तर संचालन काजल खरबडे तर आभाप्रदर्शन प्राची काळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सचिन झोड , सात्विक हातमोडे, विशाल खरबडे, अजय खरबडे लखन टेभेंकर, सुरेश झोड, रोशन काळे, युनेश चापले, संदिप झोड, सचिन वानखडे, राहुल वानखडे, कैलास मुंदाफळे, विनोद चापले, धनंजय काळे, गौरव मुंदाफळे,

सागर वानखडे, सचिन वानखडे, संदीप झोड, कैलास मुंदाफळे, लोकेश मुंदाफळे, घनश्याम चापले, कुणाल सावदे, प्रज्वल हुडके, तेजस खरबडे, राकेश चापले, ईश्वर टेंभेकर, घनश्याम चाप, अमोल रेवतकर, अंकित झोड, संदीप झोड, सचिन वानखेडे, शुभम हातमोडे, तुषार चापले,तुषार आगे, इत्यादिंसोबत शेर शिवाजी संघटना डोरली (भा.) चे मावळे व गावक-यांनी अथक परीश्रम घेतले.

RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: