पातूर – सचिन बारोकार
वऱ्हाड विकास बहुउद्देशिय संस्था राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त तसेच मॉ जिजाऊ सार्वजनिक वाचनालय, न्यु महसुल कॉलनी,अकोला येथे उद्घाटन पार पडले. यावेळी ‘राज्यस्तरिय माॅ जिजाऊ वाङमय व साहित्य आणि सामाजिक कार्याचा गौरव करण्याचा उद्देशाने विविध पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.
दि १२ जानेवारी २०२५ रोजी हा सत्कार सोहळ्यात पार पडला. यावेळी उपस्थित मान्यवर उद्घाटक श्यामराव वाहूरवाघ हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणुन विजयकुमार गडलिंगे अमरावती ग्रंथालय विभागाचे अध्यक्ष प्रभाकर घुगे, दादाराव इंगळे डॉ.प्रा.वासुदेव भगत, सचिन सावळे, सुलेमान भाई, प्रदीप गुरुखुदे, पुष्पराज गावंडे, दिलीप ब्राह्मणे, माॅ जिजाऊ वाचनालय अध्यक्ष पंजाबराव वर यांचा हस्ते सन्मानचिन्ह व गौरवपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
या अगोदर पण त्याना सावित्री लेक,स्वामी विवेकानंद पुरस्कार मिळाला असुन पातुर तालुक्यांमध्ये युवती व महिला युवावर्गा करिता पातुर येथील कान्होबा महिला बचत गटाच्या अध्यक्षा व साने गुरुजी मंडळाचा सचिव पल्लवी ज.मांडवगणे – राखोंडे यांनी गावागावात युवती व महिला एकत्र करुन नेहरु युवा केन्द व मेरा युवा भारत आणि बचत गटाचा उपक्रमामुळे आणि त्याचा सामाजिक शिक्षणाचा माध्यमातुन गावस्तरावर सामाजिक व सांस्कृतिक, पर्यावरण,
गुड टच बाॅड टच आणि मांहावारी मासिकपाळी आरोग्य,स्वच्छता,युवती व महिला सक्षमीकरण व पाच ‘ज’ वर कार्यशाळा,प्रशिक्षण, लोककला व पथनाट्यद्वारे जनजागृती करत एक चळवळ उभारलेली आहे. त्याचा सामाजिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल त्यांनापुरस्कार देऊन सन्मान करण्यात आले.
तसेच यावेळी पल्लवी व विशाल राखोंडे कडुन नविन चालु केलेला माॅ जिजाऊ सार्वजनिक वाचनालयाला विविध पुस्तके व भारतीय संविधान देऊन पुस्तक वाटेचा सहभाग दिला आहे.