अमरावती – देशातील सर्वात कठीण समजल्या जाणाऱ्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अमरावती जिल्ह्यातील पल्लवी सुखदेव चिंचखेडे हिने बाजी मारत देशात 63 Rank मिळवत आपल्या आई वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे, सोबतच जिल्हाचा देशात बहुमान वाढविला. तिच्या या अदभूत यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
अमरावतीच्या राहुल नगर, बिच्छू टेकडी येथील रहिवाशी असलेल्या पल्लवीला आजूबाजूला व्यसनाधीनतामुळे बऱ्याच जणांचे आयुष्य खराब झालेले तिने बघितले आणि आपल्या देशासाठी आणि आपल्या समाजातील लोकांसाठी काहीतरी कराव हे ठरवलं होतं, तिने त्यानंतर IAS व्हाव हे मनात पक्क केलं. आणि येथूनच पल्लवीचा यु.पी.एस.सी चा प्रवास सुरु झाला.या परीक्षेच्या तयारीसाठी पल्लवीने थेट दिल्ली गाठली.
पल्लवीचे शिक्षण बी इ मेकॅनिक पर्यंत अमरावती येथे पूर्ण केले त्यानंतर तिने एका मल्टिनॅशनल कंपनीमध्ये लाख रुपयांच्या नोकरीवर आपल्या करिअरची सुरुवात केली, दरम्यान तिने लाख रुपया पगाराच्या नोकरीचा राजीनामा दिला आणि दिल्ली येथे जाऊन केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी सुरू केली.
पल्लवीचे वडील हे रंगकाम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात आई शिवणकाम करते पल्लवीची बहिण ही एका बँकेमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर भाऊ शिक्षण घेत आहे. पल्लवी चे वडील सांगतात, पल्लवी लहान असताना अमरावती येथे आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला मी पल्लवीला घेऊन गेलो होतो दरम्यान मुंडे सरांचा भाषण तिच्या मनाला प्रभावित करून गेलं आणि तेव्हापासूनच हे स्वप्न बघायला सुरुवात केलं. मात्र अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर तिने एका कंपनीत जॉब सुरू केला आम्हाला वाटलं ही आता अभियंता म्हणूनच काम करेल मात्र तिने आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करत आमच्या मेहनतीला चित करून दाखवलं.
पल्लवीचे शिक्षण आनंद शाळेमधून झाले असून तिने आपले पूर्ण शिक्षण हे अमरावती मधूनच पूर्ण केले आहे. तिने ज्या वेळी पदवी पूर्ण केली, त्यात आलेले अपयश आणि कमी मार्कस मुळे वर्गात जास्त मित्र नसणे. त्यातून आलेला एकाकीपणा तसेच त्यावेळी समाजातील विविध प्रश्नांची झालेली जाणीव यामुळे आपण अशा प्रश्नामध्ये काहीतरी करता येईल अस तिला वाटल. त्यासाठी प्रचंड कष्ट करण्याची तयारी तिने ठेवली होती.
पल्लवी हिने स्पर्धा परीक्षा करण्याचा निर्णय घेतला. तो एक ‘भावनिक निर्णय’ होता. आकर्षणामुळे पल्लवीने हा निर्णय घेतला होता. पण प्रत्यक्षात ते किती अवघड असते हे नंतर कळले. त्यामुळे उमेदवारांनी एका गोष्टीची जाणीव ठेवली पाहिजे की, आपण या क्षेत्रात येताना सर्व गोष्टींची माहिती घेऊन यावे. यातील सर्व वास्तव समजून घ्यावे. फक्त Youtube वरील अधिकाऱ्यांचे भाषणे ऐकून मी पण अधिकारी होणार आणि मला हेच करायचे आहे. असा निश्चय केला.