Sunday, December 22, 2024
Homeराजकीयपालघर | भाजप प्रवेशानंतर माजी आमदार अमित घोडा नॉट रिचेबल...

पालघर | भाजप प्रवेशानंतर माजी आमदार अमित घोडा नॉट रिचेबल…

शिवसेनेचे पालघरचे माजी आमदार अमित घोडा हे भाजप प्रवेशानंतर लगेचच नॉट रिचेबल झाल्याने तर्कवितर्काला उधाण आले आहे. मागील आठवड्यात शिवसेनेचे माजी आमदार अमित घोडा आणि विलास तरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता. मात्र त्यानंतर अमित घोडा हे लगेचच गायब झाले असून ते नक्की कुठ गेले आहेत याचा नक्की थांगपत्ता लागत नसल्याने लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली आहे.

शनीवारी भाजपचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चव्हाण यांचा डहाणू येथे आयोजित सत्कार समारंभाला देखील घोडा यांनी दांडी मारल्याने भाजप प्रवेशानंतर काहीतरी बिनसल्याची चर्चा होत आहे.
राष्ट्रवादी कोंग्रेस सोडून शिवसेनेत प्रवेश करून २०१४ च्या निवडनुकीत निवडून आलेले आमदार कृष्णा घोडा यांच्या आकस्मिक निधनानंतर त्यांचे पुत्र अमित घोडा हे पालघर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत विजयी झाले होते.

मात्र २०१९ विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अमित घोडा यांना उमेदवारी नाकारून श्रीनिवास वणगा यांना तिकीट दिल्याने घोडा हे तेव्हापासून शिवसेना पक्षनेतृत्वावर नाराज होते.या नंतर त्यांनी दोन वेळा राष्ट्रवादी कोंग्रेसमध्ये जाऊन पुन्हा अचानक शिवसेनेत परत आले होते.वारंवार पक्ष बदलण्याच्या कृतीमुळे घोडा यांच्यावर बेभरवशाचा नेता म्हणून शिक्का बसला आहे.

शिवसेनेच्या फुटीनंतर एकनाथ शिंदे गटात जाण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आमदार,खासदार आणि नेत्यांची रिघ लागली असताना २०२४ ची विधानसभा निवडणूक आणि पालघर किंवा डहाणू विधानसभेतून लढण्याची गणिते लक्षात घेत अमित घोडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचे बोलले जाते.मात्र या याबाबत घोडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी कोणतीही चर्चा किंवा विश्वासात न घेताच भाजपमध्ये उडी मारल्याने शिंदे हे अमित घोडावर नाराज झाल्याची चर्चा असून त्याच दबावातून अमित घोडा हे नॉट रीचेबल झाले असावेत अशी कुजबूज सुरू आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: