उत्सव काळात कुलूपबंद घरांमध्ये होणाऱ्या चोऱ्या आणि घरफोडया अंकुश लावण्यासाठी बोईसर विभागाचे सहाय्यक पोलीस अधिक्षक नित्यानंद झा सरसावले आहेत. एक दिवसापेक्षा अधिक काळ घर बंद करून बाहेर जाणाऱ्यांनी दारे बंद करण्यासाठी लोखंडी कुलुपा ऐवजी इ-कॉमर्स वेबसाईटवर अल्प किंमतीत उपलब्ध असलेल्या अलार्म लॉकचा वापर करून त्यांच्या घराच्या ठिकाणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्याचे आवाहन नित्यानंद झा यांनी केले आहे.
घरफोड्या रोखण्यासाठीच्या उपाययोजना आणि अत्याधुनिक अलार्म लॉकच्या वापराचे प्रात्यक्षिक करतानाचा व्हिडीओ उपविभागीय अधिकारी नित्यानंद झा यांनी जनजागृतीसाठी व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्याचे आवाहन केलं आहे.
तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कामगारांमुळे औद्योगिक वसाहती लगतच्या ग्रामपंचायतींच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्याने लोकसंखेतही वाढ झाली आहे या समस्येवर बोईसर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी तथा सहाय्यक पोलीस अधिक्षक नित्यानंद झा यांनी उपाय शोधला आहे.
लोखंडी कुलुपा ऐवजी इ-कॉमर्स वेबसाईटवर अल्प दरात उपलब्ध असलेल्या अलार्म लॉकच्या वापरामुळे चोऱ्या,घरफोड्या आणि दुचाकीच्या चोरीचे प्रमाण घटण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. व्यापारी संकुलांमधील दुकानांच्या सुरक्षेसाठी सायरन बसवावा, चोरांकडून दुकानाचे शटर उचकटण्याचा प्रयत्न झाल्यास सायरनच्या मोठ्या आवाजामुळे चोरीच्या घटना रोखता येणार असल्याचे झा यांनी सांगितले.