PAK Vs SA : आजच्या सामन्यात पाकिस्तानने दक्षिण आफ्रिकेचा 33 धावांनी पराभव केला. पावसामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 14 षटकांत 142 धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते. पावसानंतर सामना सुरू झाला तेव्हा दक्षिण आफ्रिकेला पाच षटकांत ७३ धावांची गरज होती. इथून पाकिस्तानचा विजय निश्चित दिसत होता.
दक्षिण आफ्रिकेने पहिल्या नऊ षटकांत चार गडी गमावून ६९ धावा केल्या. यानंतर पाच षटकांत आफ्रिकन संघाने पाच गडी गमावून एकूण ३९ धावा केल्या. या स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेचा हा पहिलाच पराभव आहे. आतापर्यंत या स्पर्धेत दक्षिण आफ्रिका हा एकमेव संघ होता ज्याने एकही सामना गमावला नाही. आता आफ्रिकेचाही पराभव झाला आहे. या स्पर्धेत सहभागी झालेले सर्व संघ कोणत्या ना कोणत्या सामन्यात पराभूत झाले आहेत.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 185 धावांची मोठी धावसंख्या उभारली. पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली आणि संघाने 43 धावांवर चार विकेट गमावल्या. यानंतर मोहम्मद नवाज आणि इफ्तिखार अहमद यांनी पाकिस्तानचा डाव सांभाळला. नंतर शादाब खानने इफ्तिखारसोबत सुरेख भागीदारी करत पाकिस्तानची धावसंख्या १८५ धावांपर्यंत नेली.
या विजयासह पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम आहे. मात्र, भारत किंवा दक्षिण आफ्रिका या दोघांपैकी एकाला आपला शेवटचा सामना गमवावा लागेल, अशी पाकिस्तानची अपेक्षा आहे. तरच पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.