PAK vs AFG : एकदिवसीय विश्वचषक 2023 मध्ये आज मोठा तिसरा उलटफेर बघायला मिळाला आहे. बलाढ्य पाकिस्तानला हरवून आपली ताकद दाखवून दिली. आयसीसी विश्वचषक स्पर्धेतील आज २२ वा सामना पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात चेन्नई येथे खेळला गेला. या सामन्यात अफगाणिस्तानने पाकिस्तानला हरवून या स्पर्धेतील तिसरा सर्वात मोठा अपसेट केला आहे. अफगाणिस्तानने इंग्लंडचा पराभव केला होता, त्यानंतर नेदरलँडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता आणि आता अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानचा 8 विकेट्सने पराभव केला आहे. पाकिस्तानने प्रथम खेळताना 282 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अफगाणिस्तान संघाने 49 षटकांत 2 गडी गमावून लक्ष्य गाठले. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात अफगाणिस्तानचा हा तिसरा विजय आहे.
गुरबाज-झद्रान जोडीचे महत्त्वाचे योगदान
या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि अफगाणिस्तानसमोर 283 धावांचे लक्ष्य ठेवले. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने आज कर्णधारपदाची इनिंग खेळली आहे. बाबर आझमने 92 चेंडूत 74 धावांची खेळी केली. याशिवाय अब्दुल्ला शफीकनेही ५८ धावा केल्या. तर अफगाणिस्तानसाठी सलामीवीर रहमानुल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी संघाला चांगली सुरुवात करून 130 धावा जोडल्या. झद्रानने 87 धावांची तर गुरबाजने 65 धावांची खेळी खेळून संघाच्या विजयाचा पाया रचला.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेल्या रहमत शाहनेही शानदार फलंदाजी केली. शाहने नाबाद 77 धावा केल्या आणि दुसऱ्या विकेटसाठी झद्रानसोबत 60 धावा जोडल्या. त्यानंतर सरतेशेवटी कर्णधार हशमतुल्ला शाहिदीने नाबाद 48 धावा करत संघाला विजयाकडे नेले. पाकिस्तानकडून गोलंदाजीत शाहीन आफ्रिदी आणि हसन अलीने प्रत्येकी एक विकेट घेतली. याशिवाय एकाही गोलंदाजाला विकेटही घेता आली नाही. या स्पर्धेतील पाचव्या सामन्यात पाकिस्तानचा तिसरा पराभव झाला. यासह अफगाणिस्तान संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. दोन्ही संघांचे आता ४-४ गुण आहेत.
पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे
या पराभवानंतर पाकिस्तानचा उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. या स्पर्धेत प्रत्येक संघ 9-9 साखळी सामने खेळणार आहे. पाकिस्तानचे आता 4 सामने बाकी आहेत. स्पर्धेत टिकायचे असेल तर चारही सामने जिंकावे लागतील. तसेच, इतर संघांच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. या स्पर्धेतील 7 सामने जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहोचेल. तर निव्वळ धावगती 6-6 विजयांसह संघांमधील खेळात येईल.
Look, what this win means for us!
— Afghanistan Cricket Board (@ACBofficials) October 23, 2023
Incredible scenes in Chennai! #AfghanAtalan | #CWC23 | #AFGvPAK | #WarzaMaidanGata pic.twitter.com/G17vJ9gl5q