Monday, December 23, 2024
Homeराज्यनागपूर | इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठान…

नागपूर | इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने सन्मानित पद्मगंधा प्रतिष्ठान…

नागपूर पद्मगंधा प्रतिष्ठानचे ५ वे राज्यस्तरीय साहित्य संमेलन २आणि ३ डिसेंबर ला…

नागपूर – शरद नागदेवे

नागपूर -पद्मगंधा प्रतिष्ठान गेल्या तीस वर्षांपासून सातत्याने कार्यरत असणारी साहित्यिक – सांस्कृतिक संस्था ! पद्मगंधाचं हे ५ वं राज्यस्तरीय साहित्य संमेलन.! लोकाश्रित , लोकप्रतिष्ठीत , आणि लोकप्रिय असणा-या पद्मगंधाच्या पाचव्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष आहेत सुप्रसिद्ध समीक्षक डॉ. प्रज्ञा आपटे आणि उद् घाटक आहेत वन आणि सांस्कृतिक मंत्री मा. सुधीर मुनगंटीवार तर स्वागताध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते *मा.अजय पाटील आहेत.

विशेष अतिथी अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ .रवींद्र शोभणे ,साहित्य अकादमी पुरस्कृत जेष्ठ लेखिका मा.आशा बगे,विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे डॉ.गिरीश गांधी,कालिदास संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे,जेष्ठ लेखिका डॉ .भारती सुदामे,सुप्रसिद्ध शेफ मा.विष्णू मनोहर, पर्सिसस्टंटचे सर्वेसर्वा डॉ . आनंद देशपांडे आणि सामाजिक कार्यकर्ते मा .शंकरराव जाधव यांची उपस्थिती राहणार आहे.

कार्यक्रम नॉर्थ अंबाझरी रोड स्थित साई सभागृह ( महाराष्ट्र राष्ट्रभाषा संकुल ) येथे संपन्न होईल. दिंडी ची सुरुवात दिनांक २ डिसेंबर ला सकाळी ७ वाजता होईल १० वाजता कार्यक्रमाचे उदघाटन होईल

ह्या साहित्य संमेलनाचं वैशिष्ट्य असं की , मराठी भाषा महाराष्ट्रातून जाईल का ? मराठी भाषेचं भवितव्य काय ? याचा घेतलेला शोध आणि संशोधन म्हणजे गर्जते ही मराठी ही स्मरणिका . या स्मरणिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात येईल. आम्ही सिद्ध लेखिका संस्था , मुंबई आयोजित कार्यक्रम आहे, ” झाले मोकळे आकाश “.

या सांस्कृतिक कार्यक्रमात स्वातंत्र्योत्तर कालखंडातील स्त्री जीवनाचा आढावा सादर करणार आहेत प्रा.पद्मा हुशिंग आणि सहकारी .यानंतर सुप्रसिद्ध अभिनेते, सी आय डी फेम मा .शिवाजी साटम यांची प्रकट मुलाखत प्रभा देऊस्कर घेतील तर अखेरच्या सत्रात मा.शोभा तेलंग, इंदोर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन संपन्न होईल.

दिनांक तीन डिसेंबर रोजी राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, विशेष कार्य पुरस्कार आणि साहित्य संमेलन स्पर्धा पुरस्कार सुप्रसिद्ध शेफ मा.विष्णू मनोहर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल . भारतातल्या किती राज्यात तसेच परदेशात देखील आज मराठीचे अस्तित्व कसे प्रवाहित आहे.

महाराष्ट्रात ती किती अंगाने प्रवाहित आणि समृध्द झाली आहे यावर आधारित परिसंवाद ‘ अथांग ही मराठी ,वाहते ही मराठी ‘ या अंतर्गत डॉ शोभा रोकडे अमरावती यांच्या अध्यक्षतेखाली मा. ममता गद्रे ( कीर्तन), मा .तेजस देऊस्कर मुंबई, (नाटक, चित्रपट,मालिका) , डॉ. गणेश चव्हाण ( ग्रामीण ) या परिसंवादात आपले मत व्यक्त करतील. नंतरच्या सत्रात ‘ या वाटेवर या वळणावर ‘ हा आत्मकथनपर कार्यक्रमात मा. श्री. जयसिंग चव्हाण ( समाज सेवक) यांच्या अध्यक्षतेखाली डॉ .अशोक देशमाने (स्नेहवन आळंदी), विमला नेगी देऊस्कर (सुप्रसिद्ध गिर्यारोहक), निरुपमा देशपांडे ( बांबू प्रकल्प ,मेळघाट) आपल्या वेगळ्या जीवनाचा अनोखा प्रवास उलगडतील.

पुढील सत्रात ‘ अभिरूप न्यायालय ‘ या कार्यक्रमात डॉ. छाया नाईक, जेष्ठ लेखिका आणि जेष्ठ रंगकर्मी मा.वत्सला पोलकमवार यांचा सहभाग आहे.साहित्य संमेलनाची सांगता संमेलनाध्यक्ष डॉ. प्रज्ञा आपटे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होईल. अशा ह्या विविध साहित्य आणि सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न असलेल्या साहित्य संमेलनाला रसिक प्रेक्षकांनी बहुसंख्येने उपस्थित असावं ही विनंती पद्मगंधा प्रतिष्ठानच्या आयोजकांनी केली आहे.

Ganesh Talekar
Ganesh Talekarhttp://mahavoicenews.com
मी, गणेश दत्तात्रय तळेकर, महाव्हाईस न्यूज च्या उपसंपादकीय पदावर असून मराठी चित्रपट इंडस्ट्री, मराठी नाटक तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी व मुलाखती गेल्या 6 वर्षापासून महाव्हाईस न्यूजसाठी वृतांकन करीत आहो. सोबतच लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, कथाबोर्ड बनवणे, गायन, नृत्य आणि हिंदी, मराठी मालिकेत कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम सुरु आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: