Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedलाखपुरी येथुन निघणार रविवारी पायदळ वारी पालखी सोहळा…

लाखपुरी येथुन निघणार रविवारी पायदळ वारी पालखी सोहळा…

वुत्तसेवा – अतुल नवघरे

लाखपुरी – २५ , दरवर्षीप्रमाणे श्री क्षेत्र विदर्भकाशी लाखपुरी ते विदर्भ पंढरी शेगाव येथे श्रीराम नवमी निमित्त लक्षेश्वर हरिपाठ मंडळ लाखपुरी व लक्षेश्वर महिला भजन मंडळ लाखपुरी यांनी पायदळ वारीचे आयोजन दिनांक – २६ मार्च २०२३ ते दिनांक -२९-०३-२०२३ पर्यंत केले आहे.

दिनांक -२६ मार्च रविवारला सकाळी पालखी पूजन बाळासाहेब देशमुख व त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते गजानन महाराज मंदिर येथे सकाळी ७ वाजता पूजा आयोजित केली आहे. त्यानंतर पालखी लक्षेश्वर महाराज संस्थान येथून शेगाव करिता प्रस्थान करेल रस्त्याने वारकऱ्यांना नास्ता , चहा व फराळ यांची व्यवस्था केलेली आहे . त्याच प्रमाणे वारीतील भक्तांना भोजन व निवासाची व्यवस्था खाली दिलेल्या गावांमध्ये करण्यात आली आहे.

दिनांक -२६ मार्च दुपारी १ वाजता भोजन व्यवस्था सांगवामेळ येथे बाळासाहेब गावंडे यांच्या येथे संध्याकाळी मुक्काम व कचरूजी महाराज संस्थान म्हैसाग भोजन अविनाशपाटील गावंडे यांच्या कडून दिनांक २७ मार्च रोजी आपातापा जिनिंग येथे भोजन दुपारी १ वाजता श्री रमेशजी राठी लाखपुरी यांचे कडून संध्याकाळी निवास व भोजन लाडीज फैल अकोला येथे माहुल परिवार आणि मित्रपरिवार यांच्या कडून करण्यात येईल व दिनांक २७ ला खरब फाटा येथे वैद्यकीय सेवा व औषध पुरवठा डॉ. राहुल राऊत व शेखर देशमुख यांच्याकडून देण्यात येईल.

दिनांक २८ मार्चला दुपारी १ वाजता भोजन निमकर्दा येथे गोविंदराव खेळकर यांच्या कडून संध्याकाळी भोजन व निवास व्यवस्था , विसावा येथे भोजन रवींद्र पाटील वडतकार यांच्याकडून करण्यात येईल .दिनांक २९ मार्च रोजी १ वाजता कसुरा गार्डन येथे १ वाजता महाप्रसाद संध्याकाळी शेगाव येथे मुक्काम व भोजन व्यवस्था दिलीप वानखडे लाखपुरी यांच्याकडून करण्यात येईल. शेगाव येथे जाताना रस्त्याने चहा, नास्ता ,फराळ व भोजन व निवास व्यवस्था केली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: