Tuesday, September 17, 2024
Homeराज्यपं.स. रिक्त पदाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम...

पं.स. रिक्त पदाच्या पोटनिवडणूकीसाठी मतदार यादी कार्यक्रम…

अकोला – संतोषकुमार गवई

बाळापूर पंचायत समितीतील बटवाडी बु. येथील रिक्त सदस्य पदासाठी पोटनिवडणुकीच्या अनुषंगाने मतदार यादी तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानसार प्रारूप मतदार यादी दि. 9 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येणार असून, दि. 15 जुलैपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय मतदार याद्या अंतिम व अधिप्रमाणित करून दि. 19 जुलै रोजी प्रसिद्ध होतील. या क्षेत्रात मतदार यादी कार्यक्रमाची व्यापक प्रसिद्धी करण्याचे व निवडणूक आयोगाच्या सूचनांनुसार कार्यवाही करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी बाळापूर तहसीलदारांना दिले आहेत.

Santoshkumar Gawai
Santoshkumar Gawaihttp://mahavoicenews.com
मी संतोषकुमार गवई पत्रकारितेच्या क्षेत्रात गेल्या ३२वर्षापासून कार्यरत आहे.सकारात्मक विचार मानवी जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणतो म्हणून no negative only & only positive news यावरच माझा विश्वास आहे.संपुर्ण देशात सर्वप्रथम कारगील युध्दाचा 'आँखो देखा हाल'मांडता आला. शोध पत्रकारितेच्या माध्यमातून समाजातील चांगल्या घटना घडामोडी 'महाव्हाईस 'डिजिटल माध्यमातून समाजासमोर मांडणे हे माझ ध्येय आहे... संतोषकुमार गवई अकोला- 9689142973/9860699890
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments

error: